जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटविण्याचे भारताची फुलराणी सायना नेहवालने स्वप्न अधुरे राहिले असून तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या आणि गतविजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनला सायनाने कडवी झुंझ दिली. मात्र, कॅरोलिना मरीनने आघाढी घेत सायनाला १६-२१, १९-२१ अशा सेटमध्ये पराभूत केले.
दरम्यान, या स्पर्धेत सायना आजपर्यंत पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीची वेस सायनाला ओलांडता आली नव्हती. मात्र, यावेळी सायनाने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा नजराणा पेश करीत यंदाच्या स्पर्धेत थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. सायनाने उपांत्यफेरीत अवघ्या ४५ मिनिटांत २१-१७, २१-१७ अशा फरकाने लिंडावेनी फॅनेट्रीला धूळ चारली होती.