भारताची टेनिसपटू सोनिया मिर्झाने आपली नवी सहकारी जी झेंग हिच्या साथीने ‘न्यू हावेन’ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
प्रथमच खेळत असलेल्या झेंग आणि सानियाच्या जोडीने ऍनाबेल मेडीना गॅरीगस आणि कॅटरिना स्रेबॉटनिक यांचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये ३-३ या बरोबरीवरून आघाडी घेत पहिल्या सेटच्या अखेरीस ६-३ गुणसंख्या प्राप्त करत पहिल्या सेटवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱया सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली. पुढे प्रतिस्पर्धी गॅरीगस आणि स्रेबॉटनिक जोडीने झुंज देण्याचा प्रयत्न केला परंतु, अखेर हा सेटही ६-४ असा जिंकत सानिया-झेंग जोडीने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
सानिया मिर्झाचे या मोसमातील हे तिसरे विजेतेपद आहे.