दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने तीन नवोदीत खेळाडूंना संधी दिली आहे. डेल स्टेन आणि हाशिम आमला या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ही पहिलीच महत्वाची मालिका असणार आहे. जलदगती गोलंदाज अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, यष्टीरक्षक रुडी सेकंड आणि अष्टपैलू सेनुरन मुथुस्वामी या तीन खेळाडूंना कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारत दौऱ्यात आफ्रिकेचा संघ तीन टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. आफ्रिकेच्या टी-२० संघाचं नेतृत्व हे डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉककडे देण्यात आला आहे.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यामध्ये बदल, कसोटी सामन्यांची ठिकाणं बदलली

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ पुढीलप्रमाणे –

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), टेम्बा बावुमा (उप-कर्णधार), थेयुनिस डे ब्रुन, क्विंटन डी-कॉक, डीन इल्गर, झुबैर हमझा, केशव महाराज, एडन मार्क्रम, सेनुरन मुथुस्वामी, लुंगीसानी एन्गिडी, अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, वर्नन फिलँडर, डेन पिडीट, कगिसो रबाडा, रुडी सेकंड

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ पुढीलप्रमाणे –

क्विंटन डी-कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), वॅन डर डसन (उप-कर्णधार), टेम्बा बावुमा, ज्युनिअर डाला, बिजॉर्न फॉर्च्युन, ब्येरन हँड्रीक्स, रेझा हँड्रीक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, अँडील फेलुक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन जॉन स्मट्स