AB de Villiers has revealed that his retirement : दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावाला परिचयाची गरज नाही. स्टेडियमच्या कोणत्याही कोपऱ्यात शॉट्स खेळण्याच्या क्षमतेमुळे त्याला ‘३६० डिग्री प्लेयर’ असे नाव देण्यात आले. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक अतुलनीय खेळी खेळणारा डिव्हिलियर्स भारतात खूप लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे तो बऱ्याच दिवसांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. त्याचे भारतीय संघ आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडूंशी खास नाते आहे. आता या खेळाडूने आपल्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनलवरील शोमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या गोलंदाजी कौशल्याचे कौतुक केले. युजी चहलबद्दल तो गमतीने म्हणाला की, हा तो गोलंदाज आहे, जो त्याच्या क्रिकेटमधून निवृत्ती होण्याचे कारण बनला. आरसीबीचा त्याचा माजी सहकारी चहलबाबत तो म्हणाला की, २०१८ मध्ये जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा चहलने त्याच्यावर वर्चस्व मिळवले होते. त्याचबरोबर या चतुर गोलंदाजांने डिव्हिलियर्सला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा म्हणण्याची प्रेरणा मिळाली होती.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

आवाज मला अजूनही आठवतो –

सेंच्युरियनमधील एका खास सामन्याचा उल्लेख करताना डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी सेंच्युरियनमधील माझ्या घरच्या मैदानावर खेळत होतो. मला चांगले आठवते की तिथे खूप उष्णता होती आणि ३० धावांवर फलंदाजी करताना मी खूप थकलो होतो. मला वाटले की मी सहज चौकार मारु शकेल, पण चहल खूप हुशार आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो एक बुद्धिबळपटू आहे. त्याला माहित होते की, मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याने मला एका अद्भुत चेंडूने फसवले. त्यावेळी उडालेल्या बेल्सचा आवाज मला अजूनही आठवतो. त्यामुळे त्यासाठी युजीचे खूप खूप आभार. माझ्या निवृत्तीचे खरे कारण तूच होतास आता मी तुझा ‘बनी’ (खास विकेट) आहे.’

हेही वाचा – IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर सूर्या अर्शदीप सिंगवर का संतापला? VIDEO होतोय व्हायरल

भारताने एकदिवसीय मालिका ५-१ अशा शानदार फरकाने जिंकली –

डिव्हिलियर्सच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी चहलने त्याला सांगितले होते की, हा त्याचा पहिला दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. पण या मालिकेत त्याने कुलदीप यादवसह दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी लाइनअपला अडचणीत आणले. त्याचबरोबर टीम इंडियाने वनडे मालिकेतील आपले वर्चस्व कायम राखले आणि ५-१ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या संघांच्या लक्षात आले की, तिथल्या खेळपट्टींवर फिरकी गोलंदाजांना हाताळणे कठीण आहे.

एबी डिव्हिलियर्सची कारकीर्द –

डिव्हिलियर्सने आयपीएलच्या १८४ सामन्यांमध्ये ३९.७०च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ११६ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळले. त्याने कसोटीत ५०.६६ च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेमध्ये ५३.५० च्या सरासरीने ९५७७ धावा आणि टी-२० मध्ये २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत.