ओशाडा फर्नाडो आणि कुशल मेंडिस यांनी झळकावलेल्या शानदार नाबाद अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिला आशियाई तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतरचा जगातील तिसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १२८ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर कुशल मेंडिसने नाबाद ८४ धावांची खेळी साकारत श्रीलंकेला तिसऱ्याच दिवशी विजय मिळवून दिला. फर्नाडोने मेंडिससह शतकी भागीदारी रचत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा हातभार लावला. फर्नाडोने नाबाद ७५ धावा फटकावल्या. संक्षिप्त धावफलक द. आफ्रिका (पहिला डाव) : २२२ श्रीलंका (पहिला डाव) : १५४ द. आफ्रिका (दुसरा डाव) : १२८ श्रीलंका (दुसरा डाव) : ४५.४ षटकांत २ बाद १९७ (कुशल मेंडिस नाबाद ८४, ओशाडा फर्नाडो नाबाद ७५; कॅगिसो रबाडा १/५३). सामनावीर : कुशल मेंडिस मालिकावीर : कुशल परेरा