आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेचा फलंदाज अविष्का गुणवर्देनावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपातून मुक्तता केली आहे. गुणवर्देना आता क्रिकेटविषयक उपक्रम पुन्हा सुरू करू शकतो. “लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने श्रीलंकेच्या माजी खेळाडूला अमिरात क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहिता अंतर्गत दोन आरोपातून निर्दोष ठरविण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर तो तातडीने प्रभावीपणे क्रिकेट कारकीर्द पुन्हा सुरू करू शकेल”, असे आयसीसीने सांगितले.

 

याच न्यायालयात श्रीलंकेचा आणखी एक क्रिकेटपटू नुवान झोयसा याच्यावरही न्यायाधिकरणाने आरोप केले होते, ज्याला एका आरोपातून निर्दोष सोडण्यात आले आहे. “अपील करता येईल अशा सविस्तर निर्णयाची घोषणा केली जाईल. आयसीसी कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी लेखी निर्णय देईल”, असेही आयसीसीने सांगितले.

अविष्का गुणवर्देनाने ६ कसोटी आणि ६१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आयलसीसीच्या कोड २.१चे उल्लंघन केल्याबद्दल २०१९मध्ये त्याच्यावर बंदी घातली होती. ३० कसोटी आणि ९५ एकदिवसीय सामने खेळलेले श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज झोयसा याच्यावर कोड २.१.१चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

 

गेल्या महिन्यात विविध प्रकरणांसाठी आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत झोयसावर ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.