Varanasi Kashi Vishwanath: २३ सप्टेंबर रोजी वाराणसीला पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि कपिल देव ज्यांना क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्यांनी ‘श्री काशी विश्वनाथ’ मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन स्टेडियमच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सचिन वाराणसीला गेला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
सचिनने ट्वीट केले की, “एकाची प्रशंसा करत मोठा झालो आणि इतर दोघांसोबत फील्ड शेअर करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९८३च्या विजयाने पाया घातला आणि २०११मध्ये मला त्याचे फळ मिळाले. आज खूप आनंद होत आहे! आशा आहे की, सध्याचा भारतीय संघ २०२३ मध्ये पुन्हा एकदा ट्रॉफी घरी आणेल.”
पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खेळाडू दाखल झाले
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सुनील गावसकर,
स्टेडियमचे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल
माहितीसाठी की, उत्तर प्रदेशमध्ये बनवले जाणारे वाराणसी स्टेडियम २०२५ पर्यंत तयार होईल. या स्टेडियममध्ये ३०,०००लोकांसाठी बसण्याची जागा असेल. यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आच्छादन, वेलीची पाने आणि डमरूसारखी रचना आणि त्रिशूलच्या आकाराचे फ्लडलाइट्स यासारखे अद्वितीय डिझाइन घटक असतील.
वाराणसी स्टेडियमच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीच्या रिंगरोडजवळ असलेल्या राजतलाब भागातील गंजरी गावात जमीन संपादित करण्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर स्टेडियमच्या उभारणीसाठी ३३० कोटी रुपयांचा खर्च बीसीसीआय उचलणार आहे. या स्टेडियमची रचना ‘शिवमय’ असेल आणि काशी विश्वनाथची झलक त्याच्या डिझाइनमध्ये दिसेल. स्टेडियममध्ये चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण, ‘त्रिशूल’ आकाराचे फ्लड लाइट, वेलीच्या पानांसारखे डिझाइन पॅटर्न आणि ‘डमरू’च्या आकारात मीडिया सेंटर असेल.
वाराणसीमध्ये बांधले जाणारे हे स्टेडियम कानपूरमधील ग्रीन पार्क आणि लखनऊमधील एकना क्रिकेट स्टेडियमनंतर उत्तर प्रदेशातील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. या स्टेडियमच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These legends including sachin gavaskar kapil dev visited kashi vishwanath temple watch video avw