मुंबई खुली  टेनिस स्पर्धा

मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये तृतीय मानांकीत अमेरिकेची सॅचिआ व्हिकेरी आणि जर्मनीच्या सॅबिन लिसिकीला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की सहन करावी लागली.

व्हिकेरीने पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्यानंतर दुसरा सेट ५-७ असा गमावला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये १-५ अशी पिछाडीवर असताना तिने तंदुरुस्तीअभावी माघार पत्करली, तर लिसिकीला जपानच्या नाओ हिबीनोने पराभूत केले. स्लोवेनियाच्या दालिया जकुपोविचने तिची आगेकूच कायम राखली आहे.

दरम्यान, भारताची उदयोन्मुख टेनिसपटू कामरान कौर ठंडीला बुधवारी चीनची अग्रमानांकीत सईसई झेंगविरुद्ध झुंजावे लागणार आहे. यंदाच्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या सामन्यात सईसईने कामरानकौर ठंडीला पराभूत केले होते. त्यामुळे तिलादेखील या स्पर्धेत पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे.