Virat Kohli’s duplicate coming to Ayodhya : विराट कोहलीने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु ते आले नाहीत. मात्र, कोहलीसारखा दिसणार व्यक्ती टीम इंडियाची जर्सी परिधान करुन आला होता. त्याला रस्त्यावर जमावाने घेरले. यानंतर त्या व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अयोध्येतील असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंबहुना, त्या व्यक्तीसोबत सेल्फीसाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्याला घेरले होते. विराट कोहलीसारख्या दिसणार्‍या माणसाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्तेजित झाले होते. त्याला भेटून सेल्फी घेऊ इच्छिणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी जमली होती, असे व्हिडीओमध्ये दिसून आले. नंतर ती व्यक्ती नाराज होऊन तेथून पळून गेली. त्यानंतरही चाहत्यांनी त्याचा पाठलाग केला.

विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर –

दरम्यान, कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतल्याचे बीसीसीआयने सोमवारी सांगितले. या स्टार फलंदाजाच्या बदलीची घोषणा लवकरच करणार असल्याचे बोर्डाने सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘विराटने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे.’

हेही वाचा – Glenn Maxwell : पब पार्टीत मॅक्सवेलची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केला तपास

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of virat kohlis duplicate coming to ayodhya wearing the team india jersey went viral vbm
First published on: 23-01-2024 at 10:13 IST