CA investigates after Glenn Maxwell is hospitalised : ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. २०२३ च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या मॅक्सवेलला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करावे लागले. याचे कारण कोणताही आजार किंवा दुखापत नसून मद्यपान असल्याचे समोर येत आहे. वास्तविक, पब पार्टीदरम्यान मॅक्सवेलने इतके मद्यपान केले की त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅक्सवेलला ॲडलेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लेन मॅक्सवेलची प्रकृती बिघडली होती. ॲडलेडमधील एका पबमध्ये त्यांनी ही पार्टी केली होती. वास्तविक, मॅक्सवेल ॲडलेडमधील एका प्रसिद्ध गोल्फ स्पर्धेत सहभागी झाला होता. यानंतर तो पबमध्ये पोहोचला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा बँड सिक्स अँड आऊटही याच पबमध्ये परफॉर्म करत होता. रिपोर्ट्सनुसार, पबमध्ये पार्टीदरम्यान मॅक्सवेलने खूप पार्टी केली. यानंतर त्यांची प्रकृती खूपच बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने रॉयल ॲडलेडमधील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तथापि, मॅक्सवेल जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबला नाही, असेही अहवालात म्हटले आहे. उपचारानंतर काही वेळातच तो परतला म्हणजे तो रात्रभर हॉस्पिटलमध्ये नव्हता. मात्र, या प्रकरणाचे संपूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवालाच्या आधारे सुरू आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाला (सीए) ही बातमी उशिरा कळली. आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

हेही वाचा – ICC T20 Team : आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर, सूर्यकुमार यादव कर्णधार तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केला तपास –

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ॲडलेडमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या आठवड्याच्या शेवटी घडलेल्या घटनेची माहिती आहे आणि ते अधिक माहिती घेत आहेत,” असे सीएने एका निवेदनात म्हटले आहे. मेलबर्न स्टार्स लीग संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या मॅक्सवेलचा ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेत समावेश न करता त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 13 सदस्यीय संघात समावेश नाही.

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहली बाहेर

मॅक्सवेलला वनडे मालिकेतून विश्रांती –

ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव शिबिरात सहभागी झाल्याचे वृत्त आहे. कांगारू संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी १० विकेट्सनी जिंकली. तसेच दुसरी कसोटी २५ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. यानंतर, दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामुळे मॅक्सवेलला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca investigates after glenn maxwell is hospitalised following alcohol related incident in adelaide pub party vbm
First published on: 22-01-2024 at 18:54 IST