पटियाला : भारताची आघाडीची कुस्तीगीर विनेश फोगटचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न सोमवारी कायम राहिले. पटियाला येथे पार पडलेल्या निवड चाचणीत विनेशने ५० किलो वजनी गटातून विजेतेपद मिळवून जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी पात्रता सिद्ध केली. संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमाला बगल देत एकाच दिवशी ५० व ५३ किलो वजनी गटातून दिलेली चाचणी, तसेच ५३ किलो गटासाठीही ऑलिम्पिक संधी मिळवण्यासाठी मागितलेली लेखी हमी यामुळे कुस्ती निवड चाचणीच्या दुसऱ्या दिवशी विनेशचीच चर्चा रंगली होती.

हेही वाचा >>> WPL 2024: दीप्ती शर्माची ६० चेंडूत ८८ धावांची झुंज अपयशी ; गुजरात जायंट्स ८ धावांनी विजयी

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

विनेशच्या नियोजित ५३ किलो वजनी गटातून यापूर्वीच अंतिम पंघलने ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे. त्यामुळे विनेशने ऑलिम्पिकसाठी ५० किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑलिम्पिक संघ निवडीसाठी स्वतंत्र चाचणीत संधी मिळण्याची लेखी हमी विनेशने मागितल्यामुळे जवळपास अडीच तासाहून अधिक काळ ५० आणि ५३ किलो या दोन्ही वजनी गटातील निवड चाचणी सुरू होऊ शकली नव्हती. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या एका दिवशी केवळ एकाच वजनी गटातून चाचणी देण्याच्या नियमाला बगल देत विनेशला दोन्ही वजनी गटातून चाचणी देण्याची संधी देण्यात आली. यामध्ये ५० किलो वजनी गटात विनेशने शिवानीचा गुणांवर ११-६ असा पराभव करून विजेतेपद मिळवले आणि जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. मात्र, ५३ किलो वजनी गटात विनेशला अंजूने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर ०-१० असे पराभूत केले. त्यामुळे विनेशची या गटातून ऑलिम्पिक खेळण्याची आशा मावळली. या वजनी गटातून अंतिम निवड चाचणीस सहभागी होण्यासाठी विनेशला पहिल्या चारमध्ये येणे भाग होते. विनेशला या गटात पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.