जिंकण्यासाठी १५३ धावांचं आव्हान मिळालेल्या युपी वॉरियर्झ संघाची अवस्था ३५/५ अशी झाली होती. दीप्ती शर्मा आणि पूनम खेमनार यांनी सहाव्या विकेटसाठी ७८ चेंडूत नाबाद १०९ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. शेवटच्या षटकात युपी संघाला ६ चेंडूत २६ धावांची आवश्यकता होती. दीप्तीने दोन षटकार लगावत पुरेपूर प्रयत्न केले पण विजयासाठी ते पुरेसे ठरले नाहीत. दिप्तीने ६० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावांची दिमाखदार खेळी साकारली तर पूनमने ३६ चेंडूत ३६ धावा केल्या.

मेघना सिंगच्या पहिला चेंडू वाईड देण्यात आला. यामुळे युपी संघाला अतिरिक्त चेंडू मिळाला. पुढच्याच चेंडूवर दीप्तीने जोरदार षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर दीप्तीने एक धाव घेतली. खेमनारने एक धाव घेतली आणि युपीच्या विजयाच्या आशा मावळल्या.

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज

दीप्तीने स्ट्राईक मिळताच षटकार खेचला. पाचव्या चेंडूवर दिप्तीने एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर खेमनारने एक धाव घेतली आणि गुजरातच्या खेळाडूंनी विजय साजरा केला.

पहिल्या षटकात अॅलिसा हिलीला शबनमने तंबूत परतावलं. तिने ४ धावा केल्या. त्याच षटकात चामरी अट्टापट्टूही माघारी परतली. पुढच्याच षटकात किरण नवगिरे ब्रायसच्या गोलंदाजीवर कश्यपच्या हाती झेल देऊन परतली. तिला भोपळाही फोडता आला नाही.

ग्रेस हॅरिसला अॅशले गार्डनरने बाद केलं. श्वेता सेहरावतला शबनमने त्रिफळाचीत केलं आणि युपीची अवस्था ३५/५ अशी झाली. यानंतर दिप्ती शर्मा आणि पूनम खेमनार यांनी पडझड थांबवली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघींनी जोरदार आक्रमण केलं.

गुजरात जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावांची मजल मारली. लॉरा व्हॉल्वरडार्ट आणि कर्णधार बेथ मूनी यांनी ६० धावांची आश्वासक सलामी दिली. ही भागीदारी इक्लेस्टोनने फोडली. यानंतर गुजरातची लयच हरपली. मूनीने एकखांबी नांगर टाकून ५२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ७४ धावांची शानदार खेळी केली. गुजरातच्या उर्वरित फलंदाजांना मूनीला साथ देता आली नाही. सोफी इक्लेस्टोनने ३ विकेट्स पटकावल्या.