भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली आणि जो रूट यांनी खेळून काढत संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक ठोकलं तर सिबलीने ८७ धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीने घेतलेल्या एका निर्णयावर माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने नाराजी व्यक्त केली.

विराट की रोहित? वासिम जाफरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

डॉम सिबली आणि जो रूटने २०० धावांची भागीदारी केली. या साऱ्या प्रकाराबाबत लक्ष्मणने विराटच्या नेतृत्वशैलीवर प्रश्न उपस्थित केला. “चहापानाची विश्रांती संपल्यानंतर चेंडू जुना होता. अशा वेळी तिसऱ्या सत्रात जवळपास २०-२१ षटकांचा खेळ झाल्यावर अश्विनला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले. जेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा मुख्य फलंदाज जो रूट मैदानावर स्थिरावला आहे हे तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुमच्याकडून (कर्णधार म्हणून विराटकडून) अशी अपेक्षा नसते. कारण अशा प्रतिभावान फलंदाजाला शक्य तितक्या लवकर बाद करणं हे संघाचं ध्येय असायला हवं. पण तसं घडलं नाही”, असं लक्ष्मण म्हणाला.

IPL 2021: तब्बल ८ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी

“गोलंदाजी करताना माझ्या मते सुरूवातीला नवा चेंडू नीट वापरला पाहिजे. बुमराह आणि इशांत शर्मा दोघेही अतिशय चांगली गोलंदाजी करत होते. पहिल्या ३०-४० मिनिटांचा खेळ खूपच उत्तम होता. तसंच काहीसं उर्वरित सामन्यात करणं गरजेचं आहे. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजांना मारा करू द्या. मग अश्विनला त्याच्या अनुभवाची कमाल दाखवू द्या. आणि शाहबाज नदीम व वॉशिंग्टन सुंदर या दोघांना धावा रोखण्याचे काम द्या. म्हणजे फलंदाजांवर दबाव वाढेल”, असा सल्लादेखील लक्ष्मणने दिला.