Premium

Naveen-ul-Haq: विराट कोहलीशी भिडणाऱ्या नवीन-उल-हकच्या वाढदिवशी गंभीरची पोस्ट व्हायरल; म्हणाला, “आपके जैसे बहुत कम लोग…”

Gautam Gambhir on Naveen-Ul-Haq: माजी भारतीय फलंदाज आणि एल.एस. जी चा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि अफगाणिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक हे इंडियन प्रीमियर लीग २०२३मध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये एकत्र खेळले होते.

Very few people like you Gambhir's birthday post for Naveen-ul-Haq who will clash with Kohli
नवीन-उल-हक हे इंडियन प्रीमियर लीग २०२३मध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये एकत्र खेळले होते. सौजन्य- (ट्वीटर)

Gautam Gambhir on Naveen-Ul-Haq: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) मुळे भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि अफगाणिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांचे एकमेकांशी चांगले संबंध जोडले गेले आहेत. गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक आहे आणि यावेळी नवीन (नवीन-उल-हक) त्याच्या संघात सामील झाला होता. दरम्यान, गेल्या शनिवारी, वेगवान गोलंदाज नवीनला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गंभीर म्हणाला की “(आपके जैसे बहुत कम लोग है) तुझ्यासारखे खूप कमी लोक आहेत.” आयपीएल २०२३मध्ये नवीन-विराट कोहलीबरोबर झालेल्या भांडणाच्या वेळी गंभीरनेही आपल्या खेळाडूची म्हणजेच नवीनची बाजू घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन-उल-हक शनिवारी २४ वर्षांचा झाला आणि गंभीरने खेळाडूला शुभेच्छा दिल्या, “वाढदिवसाच्या शुभेच्छा @naveen_ul_haq! तुमच्यासारखे फार थोडे आहेत. कधीच बदलू नका!” याबरोबरचच गंभीरने अफगाणिस्तानच्या फास्ट बॉलरसोबतचा स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून हे लिहिले आहे. यावर आता सोशल मीडियामध्ये विराट कोहलीचे चाहते गंभीरच्या या पोस्टवर खूप कमेंट्स करत आहेत.

आयपीएल २०२३ दरम्यान नवीनचा कोहलीसोबत सामना झाला होता

आयपीएल २०२३ मध्ये, आरसीबीचा दिग्गज कोहली होता जो लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक आणि नंतर मैदानावर गौतम गंभीरशी भिडला होता. मैदानावर काय घडले याचा नेमका तपशील अद्याप कळलेला नसला तरी, गंभीरने नंतर स्पष्ट केले की त्याने नवीनची बाजू का घेतली आणि कोहलीचा विरोध का दूर झाला. यावर आता दोन्ही बाजूने एवढ्या दिवसात खूप स्पष्टीकरण आले असून पडदा देखील पडला आहे.

भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरने एका मीडिया हाऊसला सांगितले की, “मैदानावर त्याच्या आणि कोहलीच्या वादाबद्दल बरेच काही बोलले गेले, विशेषत: टीआरपीसाठी. पण त्यांच्यात जे घडले ते त्यांच्यातच राहिले पाहिजे कारण, त्याला कोणत्याही ‘स्पष्टीकरणाची’ गरज नाही. तसेच चॅट दरम्यान, गंभीरने नवीनला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्ट केला कारण, त्याला वाटले की अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने त्याला कोहलीकडून मिळालेल्या प्रतिक्रिया चिथावणी देण्यासाठी केलेल्या होत्या. त्यानंतर त्याने जे काही केले ते काहीही चुकीचे केले नाही.”

हेही वाचा: KL Rahul: के.एल. राहुलने फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दिले सडेतोड; म्हणाला, “गेल्या काही सामन्यात विकेटकीपिंग…”

आशिया चषक २०२३ दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांनी कोहली-कोहली अशा घोषणा स्टेडियममधून दिल्या होत्या आणि त्यावेळी देखील गौतम गंभीरने त्यांना मधलं बोट दाखवलं होतं. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियात खूप टीका करण्यात आली होती. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात विराट कोहलीला पहिल्या दोन सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohlis clash with naveen ul haqs post goes viral said there are very few people like you avw

First published on: 24-09-2023 at 21:17 IST
Next Story
IND vs AUS 2nd ODI: शुबमन-श्रेयसच्या भागीदारीने मोडला सचिन आणि लक्ष्मण जोडीचा २२ वर्ष जुना विक्रम