Premium

आरारारारा खतरनाक… टी-२० सामन्यात ठोकलं द्विशतक; १३२ धावा तर केवळ Six मधून

तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-२० सामन्यातून या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याच्या लठ्ठपणावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या.

rahkeem cornwall
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे. यूएसएमध्ये सुरू असलेल्या अटलांटा ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धेत रहकीमने ही कामगिरी केली. २९ वर्षीय रहकीमने स्वायर ड्राईव्ह संघाविरुद्ध खेळताना ७७ चेंडून १७ चौकार आणि २२ षटकारांच्या मदतीने नाबाद २०५ धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत त्याने आपले द्विशतक पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या

तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-२० सामन्यातून रहकीम कॉर्नवॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याच्या लठ्ठपणावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. कॉर्नवॉल हा फलंदाजीबरोबरच ऑफ स्पीनर सुद्धा आहे. कॅरेबियन प्रिमीयर लीगमधील धडाकेबाज प्रदर्शनानंतर त्याला वेस्टइंडिज संघात स्थान देण्यात आले होते.

हेही वाचा – “बोलताही येत नव्हतं.. विराट कोहलीने सांगितला पॅरिसमधील सर्वात वाईट अनुभव; म्हणाला, “एक वाईट स्वप्न”..

दरम्यान, अटलांटा ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वायर ड्राईव्हविरुद्ध झालेल्या सामन्यात अटलांटा फायरने १७२ धावांनी विजय मिळवला. अटलांटा फायरने २० षटकांत ३२६ धावांचे लक्ष ठेवले होते. कॉर्नवॉल व्यतिरिक्त स्टीवन टेलरने १८ चेंडूत पाच षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. तर ३२७ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्वायर ड्राईव्ह संघाला २० षटकांत ८ बाद १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्वायर ड्राईव्हकडून यशवंत बालाजीने ३८ तर वरुण साईने ३६ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: West indies allrounder rahkeem cornwall hit double century in a t20 spb

First published on: 06-10-2022 at 19:21 IST
Next Story
IND vs SA 1st ODI: मिलर-क्लासेनच्या शतकी भागीदारीने आफ्रिकेने भारतापुढे ठेवले २५० धावांचे आव्हान