जगज्जेतेपद मिळवणे सोपे असते, परंतु ते टिकवणे अवघड असते, याची अनुभूती अनेक खेळाडूंनी आणि संघांनी घेतली आहे. चौसष्ठ चौकटींच्या जागतिक अजिंक्यपदावर मोहोर उमटवण्यासाठी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला या वर्षी पुन्हा आव्हान असणार आहे ते भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचे. k03शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन बुद्धिबळ सम्राटांमधील विश्वविजेतेपदाच्या लढतीकडे जगभराचे लक्ष लागले आहे.
नॉर्वेच्या कार्लसनने गतवर्षी चेन्नईत भारताच्या आनंदवर मात करीत विश्वविजेतेपद त्याच्याकडून खेचून आणले होते. त्या वेळी त्याने आनंदवर ६.५-३.५ असा विजय मिळविला होता. त्या वेळी कार्लसन २२ वर्षांचा होता तर आनंद ४४ वर्षांचा होता. घरच्या मैदानावर झालेल्या या लढतीमधील पराभवाने खचून न जाता आनंदने त्यानंतर कार्लसनचा आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या स्पर्धेत अनेक तुल्यबळ खेळाडूंवर मात करीत प्रथम स्थान घेतले. त्यामुळे पुन्हा कार्लसन याच्याशी खेळण्याची संधी आनंदला मिळाली आहे. या दोन खेळाडूंमध्ये त्रयस्थ ठिकाणी ही लढत होत असल्यामुळे घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ कोणालाच मिळणार नाही. त्यामुळेच या लढतीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.k02चेन्नई येथे कार्लसनविरुद्ध विश्वविजेतेपदाची लढत गमावली. हा पराभव आता इतिहासजमा झाला आहे. आव्हानवीर स्पर्धा जिंकून मी संपलो अशी टीका करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले आहे. आता माझ्यावर कोणतेही दडपण नाही. ही लढत त्रयस्थ ठिकाणी होत असल्यामुळे मी आत्मविश्वासाने खेळणार आहे. विजेतेपद टिकविण्याचे आव्हान कार्लसनपुढे आहे. विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर मी कार्लसन याच्यावर मात केली आहे. हा विजय माझ्यासाठी मनोधैर्य उंचावणारा आहे. गतवेळच्या पराभवापासून मी खूप काही शिकलो आहे. यंदाच्या लढतीसाठी चांगला गृहपाठ केला आहे.
– विश्वनाथन आनंद

गतवर्षी आनंदवर मात करीत मी मिळविलेले विश्वविजेतेपद हा चमत्कार नव्हता, हे सिद्ध करण्यासाठी मी k04यंदा सज्ज झालो आहे. अर्थात, आनंदवर मात करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पराभवाची परतफेड करण्यासाठी तो यंदा निश्चितपणे जोरदार प्रयत्न करणार ही मला खात्री आहे. त्यामुळेच मी सावधपणे खेळणार आहे. विश्वविजेतेपदानंतर जरी मी एकदा आनंदकडून पराभव स्वीकारला असला तरी त्याचे मी खूप बारकाईने विश्लेषण केले आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी मी घेत आहे.
– मॅग्नस कार्लसन