विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी पराभूत करत परतफेड केली आहे. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्याक्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतायी संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपंल आव्हानं जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घरसला आहे.

चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे.

आणखी वाचा- IND vs ENG: इंग्लंडची दाणादण उडवत ‘टीम इंडिया’ने केला ‘हा’ विक्रम

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल दोन संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सामना होणार आहेत. चेन्नई कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ट्विट करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची काही समीकरणं सांगितली आहेत. आयसीसीनं सांगितलेल्या समिकरणानुसार भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ अद्याप कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळू शकतात.

आणखी वाचा- IND vs ENG: धमाकेदार विजयासोबतच विराटची धोनीच्या पराक्रमाशी बरोबरी

काय आहे समीकरण –

भारतीय संघाला इंग्लंडचा ३-१ किंवा २-१ नं पराभव करावा लागेल.

इंग्लंड संघाला भारताचा ३-१ नं पराभव करावा लागेल.

इंग्लंड संघानं भारताचा २-१ न पराभव केल्यास, किंवा कसोटी मालिका १-१ किंवा २-२ अशी बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलमध्ये पोहचू शकतो.

आणखी वाचा- IND vs ENG: अश्विनच्या धडाकेबाज कामगिरीवर गावसकर म्हणतात…

ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा WTC गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळालं. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.