05 August 2020

News Flash

आयफोनचा श्वास  ‘आयओएस’

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आयओएस होय.

तंत्रज्ञानाच्या जगतात बँड्र म्हणून स्वतची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या

आणि मोबाइलच्या स्पर्धेत स्वतचे अस्तित्व टिकवलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनने अनेकांच्या मनावर आजही गारूड केलेले आहे. टीव्ही, मोबाइल, संगणक, ईअरपॉड, आयपॉड यांसारखी अ‍ॅपल कंपनीची विविध उत्पादने अनेकांमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र या सर्वामध्येही विशेष आहे ते म्हणजे  अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल. आयफोन ज्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो त्या ‘आयओएस’ आवृत्तीच्या महत्त्वाच्या अपडेटविषयी जाणून घेऊ या..

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आयओएस होय. आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम याचा शॉर्ट फॉर्म करून आयओएस झाले असे म्हणता येईल. आज प्रत्येक आयफोन मोबाइल, आयपॅड हे या ऑपरेटिंग सिस्टीमवर सुरू असतात. आयपॅडलाही ही ऑपरेटिंग सिस्टीम २०१० मध्ये सुरू झाली. मोबाइलच्या आतील विविध घटक आकर्षकरीत्या चालू ठेवण्याची जबाबदारी ही आयओएसवर असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्वाइप, टॅप, पिंच, रिव्हर्स पिंच या मूळ तत्त्वांपासून आयओएस उभा राहू लागला. आयओएस १ ते सध्याचा आयओएस १३.२ पर्यंतचा प्रवास हा १३ आकडय़ांचा नसून फार मोठा आहे. अ‍ॅपल कंपनी मोबाइलच्या उत्पादनातील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच ग्राहकांना अद्ययावत आणि विशेष पर्याय मोबाइलमध्ये देण्यासाठी आयओएसमध्ये विविध अपडेट आणत असते. सध्या १३.२ हा नुकताच आयओएसचा अपडेट आहे. तो २८ ऑक्टोबर २०१९ ला अस्तित्वात आला. तसेच १३.३ बेटा १ हा मोबाइलच्या सॉफ्टवेअरमधील ऑपरेटिंग सिस्टीममधील त्रुटी दूर करण्यासाठीचा अपडेटही दोनच दिवसांपूर्वी बाजारात आला. आयओएसमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल इन्स्टॉलेशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. सी, सी प्लस प्लस, ऑब्जेक्टिव्ह सी, स्विफ्ट या प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर आयओएस तयार झालेले असून ते सध्या कार्यरत आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये २० लाखांहून अधिक विविध प्रकारची अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत.

भारदस्त तरीही हलका  ‘एअर १२’

भारत ही वैशिष्टय़पूर्ण मोबाइलची मोठी बाजारपेठ बनली आहे. या बाजारपेठेत अतिशय आधुनिक वैशिष्टय़े असलेले महागडे स्मार्टफोन मिळतात तसेच आधुनिकतेचा साज चढवून आलेले स्वस्त स्मार्टफोनही उपलब्ध आहेत. विशेषत: दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनची मोठी जंत्रीच आपल्याला बाजारात पाहायला मिळते. अशाच कंपन्यांमध्ये ‘टेक्नो मोबाइल्स’ ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भारतीय बाजारपेठेत स्वस्त स्मार्टफोन घेऊन येताना दिसते. याच कंपनीने दिवाळीपूर्वी ‘टेक्नो कॅमन १२ एअर’ हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. सुमारे ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असलेला ‘कॅमन १२ एअर’ हा विविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण आहे.

‘कॅमन १२ एअर’चे बाह्यवरण (बॉडी) प्लास्टिकने बनलेली आहे. बेबी ब्ल्यू आणि स्टेलर पर्पल अशा चकचकीत रंगांच्या पर्यायांत उपलब्ध असलेले मागील बाजूचे पॅनेल अतिशय आकर्षक दिसते. फोन हातात घेताक्षणी सर्वप्रथम जाणवते ती गोष्ट म्हणजे त्याचे वजन. अवघे १७२ ग्रॅम वजन असलेला हा फोन हातात सहज सामावतो आणि हाताळायलाही सोपा आहे. या फोनच्या पुढील बाजूकडे वळल्यावर सर्वप्रथम त्याचा ‘डॉट नॉच’ डिस्प्ले लक्ष वेधून घेतो. या फोनमध्ये ६.५५ इंच आकाराचा एचडी प्लस डिस्प्ले पुरवण्यात आला असून १५२० बाय ७२० पिक्सेल रेझोल्युशनमुळे त्यावरील चित्र अतिशय सुस्पष्ट दिसते. याचा ब्राइटनेसही अतिशय चांगला आहे.

या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज पुरवण्यात आली आहे. सध्या जवळपास सर्वच स्मार्टफोन  इतक्या क्षमतेची मेमरी उपलब्ध करून देतात. त्यामुळे यात ‘कॅमन १२ एअर’ काही वेगळे देत नाही. जोडीला २५६ जीबी मायक्रोएसडी कार्डने मेमरी वाढवण्याची क्षमताही पुरवण्यात आली आहे.  हा फोन अँड्रॉइन पाय या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत असून त्याला ‘टेक्नो’च्या स्वत:च्या इंटरफेसचीही जोड देण्यात आली आहे.

‘टेक्नो कॅमन १२ एअर’मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यात १६ मेगापिक्सेलची मुख्य लेन्स, पाच मेगापिक्सेलची वाइड अँगल लेन्स आणि दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर अशा कॅमेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे दूरचे छायाचित्र काढण्यापासून अगदी जवळच्या किंवा छोटय़ा वस्तूचे सुस्पष्ट छायाचित्र काढण्याची सुविधा हा फोन देतो. पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला असून तोही आपले काम चोखपणे पार पाडतो.

या फोनमध्ये चार हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. ही बॅटरी एक दिवस टिकू शकते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, वरील सर्व वैशिष्टय़े पाहिली तर त्या तुलनेत बॅटरीची क्षमता आणखी असायला हवी, असे वाटल्यावाचून रहावत नाही. सध्या मोबाइलचा जितक्या जास्त प्रमाणात वापर होतो, ते पाहता बॅटरीची क्षमता जितकी जास्त तितका वापरकर्त्यांना अधिक वेळ मिळतो. बॅटरीतील ही उणीव सोडता ‘कॅमन १२ एअर’ हा दहा हजार रुपये किमतीच्या घरात एक चांगला पर्याय आहे.

अ‍ॅपलच्या काही महत्त्वाच्या आवृत्तींविषयी (अपडेट) विषयी जाणून घेऊ या .

आयओएस आवृत्ती १

ही आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमची पहिली आवृत्ती. २९ जून २००७ रोजी ही आवृत्ती बाजारात आली. सुरुवातील या सिस्टीमला आयओएस असे नाव नव्हते तर अ‍ॅपल डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम

या नावाने या सिस्टीमला ओळखले जायचे. या आवृत्तीमध्ये सुरुवातीच्या काळात आयफोनमधील काही त्रुटी दूर झाल्या.

आयओएस आवृत्ती २

या आवृत्तीच्या अपडेटमध्ये अ‍ॅपलने मोबालच्या सॉफ्टवेअरसाठी अनेक बदल आणले. रोडमॅप कीनोट हा पर्याय या अपडेटमध्ये वापकर्त्यांना मिळाला. ११ जुलै २००८ रोजी ही आवृत्ती बाजारात आली.

आयओएस आवृत्ती ३

१७ जून २००९ रोजी ही आवृत्ती बाजारात आली आणि या अपडेटमध्ये अ‍ॅपलने आयफोनच्या सॉफ्टवेअर यंत्रणेत अनेक बदल केले. काळानुसार हे बदल करणेदेखील अपेक्षित होते. आकर्षक चित्र गुणवत्ता ही आवृत्तीमध्ये वापकर्त्यांना मिळाली.

आयओएस आवृत्ती ४

२१ जून २०१० मध्ये हा अपडेट आयफोन वापरकर्त्यांसाठी आला. स्क्रीन वॉलपेपरचा पर्याय या अपडेटमध्ये आला. तसेच याअगोदरच्या अपडेटमध्ये आयफोन धिम्या गतीने सुरू असे. मात्र आवृत्ती ४ नंतर आयफोनचे सॉफ्टवेअर कार्य विनाअडथळा वेगाने सुरू झाले.

आयओएस आवृत्ती ५ ते १०

आयओएस आवृत्ती ५ ते १० मध्ये आयफोनने बदलणाऱ्या काळानुसार आणि वापरकर्त्यांच्या गरजेनुसार आयफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये अधिक बदल केले. मोबाइलवर दिसणाऱ्या विविध अ‍ॅप्लिकेशनमधील पर्यायांची मांडणी या सर्व आवृत्त्यांमध्ये बदलत अधिक आकर्षक होत गेली. कॅमेऱ्याची उत्कृष्ट गुणवत्ता, चांगला आवाज, सुयोग्य दर्जाचे चित्र दर्शवणारी डिस्प्ले गुणवत्ता, आयफोन ड्रॉप्ड, विशेष जीपीएस मॅप यांसह विविध त्रुटी आयओएसच्या या आवृत्त्यांमध्ये दूर झाल्या.

आयओएस १३.२

नुकताच आलेला आयओएसचा अपडेट म्हणजे १३.२ होय. यामध्ये अ‍ॅपलने फोटो आणि व्हिडीओ एडिट करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच डॉर्क मोड, लाइट मोड हे दोन्ही पर्यायदेखील या अपडेटमध्ये आहेत.

संकलन – ऋषीकेश मुळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 2:08 am

Web Title: i phone ios brand akp 94
Next Stories
1 उदबत्तीचा अतिवापर नको!
2 झुकिनी क्रिस्पस्
3 नियमांची नवलाई!
Just Now!
X