साहित्य

१ वाटय़ा कोलीम, २ मध्यम आकाराचे कांदे, १ अंडे, पाव वाटी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, २ चमचे आलं-लसूण वाटण, अर्धा चमचा हळद, २ चमचे तांदुळाचे पीठ, २ चमचे व्हिनेगर, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती

प्रथम कांदा बारीक चिरा. तो हातांनी चांगला मळून घ्या. वाटून घ्या. त्यात कोथिंबीर, मिरची, आलं-लसणाचं वाटण, अंडे, व्हिनेगर, मीठ व कोलीम हे सगळे जिन्नस एकत्र करावेत. सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान मळून घ्या. त्याचे छोटे छोटे वडे थापा. आता कढईत तेल घ्या. ते पुरेसे गरम झाल्यावर त्यात वडे तळून घ्या. वडे झाकण लावून तळा. म्हणजे तेलात वडे सोडल्यावर जरा झाकण ठेवून ते शिजू द्या. त्यानंतर ते उलटा. परत २-३ मिनिटं तेलात शिजू द्या. मगच बाहेर काढा. बटाटेवडय़ांप्रमाणे ते पटापट तळण्याची घाई करू नका.