हा झटपट होणारा पदार्थ आहे. आवडीप्रमाणे त्यातील पदार्थ घेऊ शकता.

साहित्य – १ वाटीभर जाड रवा शक्यतो न भाजता, गूळ किसून चवीप्रमाणे, पाव वाटी आंबट दही, एक पिकलेले केळे, मनुका, काजू, टूटीफ्रूटी, खजूर. यातील काजू, मनुका आणि खजूर तुपात लालसर परतून त्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे.

treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…
Face Serum Benefits
Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून…
diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

कृती –  सर्व साहित्य एकत्र करून दहाएक मिनिटे भिजवून ठेवावे. गूळ विरघळवून मात्र घ्यावा. वाटल्यास दह्य़ात गूळ आधीच भिजत घालावा. मिश्रण सुरुवातीला पातळ वाटेल, पण नंतर ते घट्ट होते. आप्पेपत्रात तूप सोडून छोटे छोटे आप्पे काढावेत. मुलांना खूप आवडतात. यात हवं तर अननसाचे छोटे तुकडेही घालू शकता. भाजताना मात्र तूपच वापरा.