खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. खांद्याच्या पुढील बाजूस असलेल्या स्नायूचा व्यायाम अधिक केला जातो. त्यामुळे खांद्याचा पुढील बाजूस असलेला स्नायू अधिक मजबूत असतो, त्यामानाने मागील बाजूस असलेला स्नायू कमजोर असतो. त्यामुळे यावेळी आपण खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूच्या मजबुतीसाठी व्यायाम करणार आहोत.

कसे कराल?

थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा, तर दुसरे टोक एका हाताच्या बोटांभोवती गुंडाळा. सुरुवातीलाला थेराबँडला थोडा ताण द्या आणि हाताचा कोपर सरळ ठेवा आणि मागच्या बाजूस न्या. (छायाचित्र १ पाहा.)

आता हात पुढे घेऊन हाताचा कोपर काटकोनात वाकवा (छायाचित्र २ पाहा). असे करताना खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंना थोडा ताण द्या. दररोज किमान १० वेळा असे करा. काही दिवसांनी संख्या वाढवू शकता.

dr.abhijit@gmail.com