बाजारात काय? :  सुहास धुरी

घंटा ही सांगीतिक आणि धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाचे प्रतीकात्मक उपकरण आहे. ही धोक्याची किंवा कोणी आल्याची सूचनाही करत असते. सार्वजनिक रूपातील ही घंटा आज प्रत्येकाच्या  दरवाजात जाऊन बसली आहे. ती म्हणजे आपली सर्वाची कुटुंबाची सोबती म्हणजे डोअरबेल.

काही ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्याने डोअरबेल अद्याप तेथपर्यंत पोहोचल्या नाहीत. कडी ठोकावणे किंवा दरवाजावर अडकवलेली घंटा वाजविणे हेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र शहरी भागात संकटे ही दारी उभी असल्याने सुरक्षेसाठी डोअरबेल उपयोगात आणणे आज गरजेचे झाले आहे. पूर्वी साध्या म्हणजे बटन दाबताच ‘टिंगटाँग’ असा आवाज करणाऱ्या बेल होत्या. त्या आजही मिळत आहेत. नंतर त्याच्यात कालांतराने बदल होत गेल्यानंतर त्यामध्ये धार्मिक , चित्रपट गाणी, प्रेरणा देणारी हवी ती धून ऐकायला मिळू लागली. विजेवर चालणाऱ्या या बेल विजेशिवायही चालू लागल्या. असे अनेक विविध बेल आजही बाजारात उपलब्ध आहेत.

पुढे यामध्ये अधिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि दरवाजाबाहेरील समोरच्या व्यक्तीचा चेहरा, त्याच्या हालचाली त्याचे बोलण या बेलमधून टिपता येऊ लागले. अनेक कंपन्यांनी त्याच्यात आपली कौशल्य पणाला लावून या डोअरबेलची निर्मिती केली आहे. बाजारात आलेल्या या व्हिडीओ डोअर बेलचा भव्य निवासी संकुलात अधिक वापर होताना दिसत आहे. ही बेल वायर फ्री आहे.

या डोअरबेलमध्ये प्रामुख्याने १०८० पी व्हिडीओ कॅमेरा, मोशन डिटेक्शन, लाइफ टाइम परचेस प्रोटेक्शन (चोरीला गेला तरी कॅमेरा परत मिळण्याची गॅरंटी), तुमच्या घरानुसार रंगसंगतीचे पर्याय, वायफाय कनेक्टीव्हीटी आहे. यामध्ये मायक्रोफोन देण्यात आला आहे. तुमच्या घराची बेल दाबली की तुमच्या मोबाइलमध्ये तसे संकेत मिळते. त्यावरून दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीशी तुम्ही साधू शकता. त्यामुळे निरोप अदानप्रदानाचे कामही सहजरीत्या होऊ शकते. हा संवाद तसेच त्याचे छायाचित्र, हालचालीही मोबाइलद्वारे टिपता येते. जेणेकरून काही प्रसंगी पुराव्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्याचप्रमाणे ही बेल जरी दरवाजाबाहेर असली तरी धुळीशी त्याचा संपर्क येत नाही. अशा पद्धतीने ती तयार करण्यात आली आहे. ही बेल लावण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रीशियनची गरज नाही सहजरीत्या तुम्हाला ज्या ठिकाणी लावायची आहे तेथे तुम्ही लावू शकता. एकंदरीत सीसीटीव्ही कॅमेरासारखे सुरक्षितता वाढविणारे हे उपकरण असून परंतु ते केवळ कुटुंबीयांपुरतेच मर्यादित आहे. पॅनॉसोनिक, हैवेल्स, गोदरेज, रिंग, ऑक्सो, कोना, झीमोडो, रिमो बेल, शाओमी अशा विविध कंपन्यांच्या डोअर बेल उपलब्ध असून त्याच्या किमती रु. १,५०० पासून ते ५० हजार रुपयांपर्यंत आहेत.

वैशिष्टय़े

  •  १०८० पी व्हीडिओ कॅमेरा एचडी
  •   मोशन डिटेक्शन
  •  लाइफ टाइम परचेस प्रोटेक्शन
  • अंधारातही दृश्य स्पष्टपणे टिपणे शक्य
  •  रंगसंगतीचे पर्याय, एचडी वायरलेस.
  •  वायफाय कनेक्टीव्हीटी.
  •  सुसंवादासाठी मायक्रो-स्पीकर फोन.
  •  डोअर बेल दाबल्यास मोबाइलवर त्वरित त्याचे संकेत.
  •  धुळीशी संपर्क येत नाही.
  •  इलेक्ट्रिक किंवा बॅटरीचा वापर.

suhas.dhuri@expressindia.com