डॉ. अविनाश भोंडवे

आपला डोळा म्हणजे फोटो काढायच्या एखाद्या कॅमेऱ्यासारखाच असतो. कॅमेऱ्यामध्ये जसे समोरच्या चित्रापासून निघणारे किरण भिंगातून येऊन फोटो निघतो, तसेच समोरील दृश्यापासून निघणारे किरण डोळ्याच्या भिंगातून दृष्टिपटलावर पडले की आपल्याला ते दिसते. मात्र नेहमी काचेसारखे पारदर्शक असलेले डोळ्यातील भिंग (नेत्रमणी /लेन्स) साबुदाण्यासारखे पांढुरके होते, तेव्हा मोतिबिंदू झाला आहे, असे म्हणतात.

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

मोतिबिंदू कसा होतो?

नेत्रमणी हा डोळ्याच्या बाहुलीच्या मागे आतील बाजूस असलेला, प्रथिनयुक्त द्रव पदार्थाने भरलेला एक पारदर्शक आणि दोन्ही बाजूने बहिर्गोलाकार भाग असतो. त्यावर एक पातळसे आवरण असते. वयोमानानुसार द्राव थोडा घट्ट होऊन त्याची गुठळी बनत जाते. सुरुवातीला छोटय़ा आकाराची गुठळी कालांतराने आकाराने वाढून अपारदर्शक बनते आणि दृष्टी मंदावते.

कारणे 

* वाढते वय हे मुख्य कारण. वयाच्या चाळिशीनंतर मोतिबिंदूची सुरुवात होऊन साठीमध्ये दृष्टीवरील त्याचे परिणाम दिसायला लागतात.

* जनुकीय दोषांमुळे काही अर्भकांना जन्मजात मोतिबिंदू असतो.

* शरीरातील चयापचय क्रियेच्या काही आजारात, मधुमेहात मोतिबिंदू होण्याची शक्यता अधिक असते.

* लहानपणी डोळ्याला इजा झालेली असल्यास तरुण वयातही मोतिबिंदू होऊ  शकतो.

* काही बाह्य़ गोष्टींनी मोतिबिंदू होण्याची शक्यता वाढते. यामध्ये धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, तीव्र उन्हात गॉगल न वापरता फिरणे, संततिनियमनाच्या हॉर्मोन्सच्या गोळ्या, कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या स्टॅटिनच्या गोळ्या, पूर्वीची डोळ्यावरील शस्त्रक्रिया, खूप जास्त दीर्घ दृष्टिदोष अशी कारणे आढळतात.

लक्षणे

* दृष्टी अंधुक होते.

* रंग फिके दिसतात.

* रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना समोरच्या गाडय़ांच्या हेडलाइट्स भोवती किंवा रस्त्यावरील दिव्यांभोवती काळे वर्तुळ दिसते.

* दिवसा जास्त प्रकाश असल्यास कमी दिसते. पण संध्याकाळच्या कमी प्रकाशात दृष्टीत थोडी सुधारणा वाटते.

* काही जणांना समोरच्या वस्तूच्या एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसतात.

* चष्म्याचा नंबर सतत बदलत जातो.

आधी थोडे धुरकट दिसणारे भिंग हळूहळू जास्त पांढरे दिसू लागते. याला मोतिबिंदू पिकणे म्हणतात. मोतिबिंदू जसजसा पिकू लागतो तसतशा दृष्टीच्या तक्रारी वाढू लागतात.

निदानपद्धती- दृष्टी कमी झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या रुग्णाच्या डोळ्यांचे दृष्टिमापन केले जाते. नंतर रुग्णाच्या डोळ्याची बाहुली प्रसरण पावण्यासाठी डोळ्यात थेंब टाकले जातात आणि ‘स्लिट – लॅम्प’ मायक्रोस्कोपद्वारे डोळ्यातील कॉर्निया हा पारदर्शक पडदा, बुबुळ (आयरिस) आणि नेत्रमण्याची बारकाईने तपासणी केली जाते. त्यानंतर दृष्टिपटल आणि डोळ्याच्या मज्जातंतूंची पाहणी करून मोतिबिंदूचे निदान केले जाते.

उपचार

* मोतिबिंदू म्हणजे अंधत्वातील टाळता येण्याजोगा विकार मानला जातो.

* मोतिबिंदूचा उपचार फक्त शस्त्रक्रियेनेच होतो. यामध्ये टाक्याची आणि बिनटाक्याची ‘फेको’ अशा दोन मुख्य पद्धती आहेत. डोळ्यातील भिंग काढून त्याजागी त्या रुग्णाला उपयुक्त ठरेल असे कृत्रिम भिंग बसवले जाते. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया जवळजवळ बिनधोक असते.