|| आशुतोष बापट

सातारा

शनिवार

शांतनिवांत साताऱ्याला जावे. १२ किमीवर धावडशीला जावे. पेशवे, शाहू छत्रपतींचे गुरू यांचे हे स्थळ आहे. तिथले मंदिर आणि पाण्याचे हौद देखणे आहेत. डोंगरावर असलेल्या मेरुलिंगला जावे. शिवालय सुंदर आहे आणि वरून परिसर सुंदर दिसतो. पुढे लिंब इथे जाऊन १५ मोटांची विहीर पाहावी. शाहू छत्रपतींची राणी वीरुबाई यांनी बांधलेली ही देखणी विहीर आहे. लिंबमध्ये चविष्ट बासुंदी मिळते. शेजारीच गोवे गाव आहे तिथले कृष्णाकाठावरील कोटेश्वर मंदिर पाहावे. पुढे साखर कारखान्यावरून किकली गावी जावे. प्राचीन भैरवनाथ मंदिर पाहावे.

रविवार

साताऱ्याच्या जवळ असलेल्या जरंडेश्वर डोंगरावर जावे. चढायला अर्धा तास पुरतो. वरती मारुतीचे सुंदर मंदिर आणि शिव मंदिर आहे. जवळ असलेल्या नांदगिरीवर (कल्याणगड) जावे. माथ्यावर एकच झाड आहे ते लांबूनही दिसते. किल्ल्याच्या दारातून आत गेल्यावर एका गुहेत जैन र्तीथकरांची प्रतिमा तसेच दत्तमूर्ती आहे. पूर्वी या लेण्यांत पाणी असे, आता सिमेंटचा मार्ग आहे. दुपारनंतर रहिमतपूर रोडवरील देगाववरून पाटेश्वरला जावे. डोंगरावर अध्र्यापर्यंत गाडी जाते. पुढे अर्धा तास चालावे लागते. वरती सुंदर बारव आहे. पुढे काही लेण्यांमध्ये अनेक शिवलिंग आहेत. त्यातले सहस्रलिंग सुंदर आहे. वरून परिसर अतिशय सुंदर दिसतो. थंडगार वारा आणि विविध पक्ष्यांचे दर्शन होते.

ashutosh.treks@gmail.com