रोज कॉलेज किंवा ऑफिसला निघण्याच्या घाईत मॅचिंग कानातले शोधणं हे दिव्यच असतं. अनेक लहान-मोठय़ा दागिन्यांच्या गर्दीतून हवे ते कानातले सापडत नाहीत, काही वेळा एकच कानातलं सापडतं आणि त्याचा जोड मात्र हरवलेला असतो. अशा वेळी हवे ते कानातले अगदी सहज मिळावेत म्हणून एक छोटीशी आणि अगदी सोपी कलाकृती घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून झटपट बनवता येईल.

साहित्य

सॅटिन रिबनच्या आतील थर्माकोल, पातळ स्पंज, गम (फेव्हिबाँड), कात्री कृतील्ल बाजारातून आणलेली सॅटिन रिबन वापरून झाली की त्याच्या आतील  थर्माकोल कचऱ्यातच जातो. हे थर्माकोलचे ३-४ गोल तुकडे साठवून ठेवावेत आणि एकमेकांवर चिकटवावेत.

  • गमच्या सहाय्याने सर्व बाजूंना पातळ स्पंज चिकटवावा.
  • पूर्ण वाळू द्यावे. त्यावर लोंबते कानातले अडकवता येतील. अशा प्रकारे थर्माकोलचा पुनर्वापर करता येईल.
  • कानातल्यांप्रमाणेच अन्य टोकदार आभूषणे अडकवण्यासाठीही या उशीचा वापर करता येईल. विविध रंगांचे स्पंज वापरून ही कलाकृती अधिक आकर्षक करता येईल.

apac64kala@gmail.com