कॉर्पोरेट वर्तुळात वावरताना तसेच बिझनेस एटिकेटचा भाग म्हणून इतर व्यक्तींशी ओळख करून घेताना काही शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक ठरते. स्वत:ची ओळख करून देताना अथवा इतरांची ओळख करून घेताना काही गोष्टी जरूर विचारात घ्याव्यात..

’ स्वत:ची ओळख करून देताना आपले संपूर्ण नाव सांगून नमस्कार करावा अथवा हस्तांदोलन करावे.
’इंग्रजीतून बोलत असाल तर स्वत:ची ओळख करून देताना मिस्टर अथवा मिसेस असं संबोधन वापरू नये. म्हणजे ‘आय एम मिस्टर कुणाल’ म्हणण्याऐवजी ‘आय एम कुणाल’ अशी ओळख करून देणे योग्य ठरेल. हल्ली अनेक जण ‘मायसेल्फ कुणाल’ अशी ओळख करून देताना दिसतात. मात्र हे व्याकरणदृष्टय़ा चुकीचं आहे.
’वरिष्ठांनी कार्यालयात नव्याने दाखल झालेल्या व्यक्तीची इतर सर्वाशी ओळख करून द्यायला हवी. तुमच्या टीममधल्या नव्या सदस्याशी ओळख करून देण्याचे काम तुमच्या संघप्रमुखाचे आहे.
’अनेकदा भारतीय आडनावांमध्ये बरेच साम्य दिसून येते. उदा. शेट, शेठ, सेठ. अशा वेळेस त्या व्यक्तीला विचारून त्याच्या नावाचा योग्य उच्चार करावा. अन्यथा अनेकदा अयोग्य उच्चारामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते.
’तुम्ही जर कुणाची ओळख तिसऱ्या व्यक्तीला करून देत असाल तर त्या व्यक्तीच्या नावासोबत त्याची थोडी व्यावसायिक माहितीही द्यावी. उदा. .. ही व्यक्ती अमुक एका कंपनीत अमुक एका पदावर काम करते. ते करताना तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्यावसायिक विशेषणाचाही उपयोग करता येईल. उदा. डॉक्टर, अ‍ॅडव्होकेट.
’संरक्षण दलातील व्यक्तींची ओळख त्यांच्या रँकसह करावी. हा रँक निवृत्तीनंतरही व्यक्तीच्या नावासमोर
लावला जातो.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…