कॉर्पोरेट वर्तुळात परस्परांना भेटल्यानंतर हस्तांदोलन करणं शिष्टसंमत मानलं जातं. हस्तांदोलन योग्य प्रकारे कसं करावं, यासंबंधीच्या संकेतांचं पालन करणं आवश्यक आहे. त्याविषयी..

’भेटल्यावर परस्परांचं अभीष्टचिंतन करणं याला कॉर्पोरेट वर्तुळात खूप महत्त्व आहे. नमस्कार करणं, हस्तांदोलन करणं, टाळी देणं यापकी कुठल्याही प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीची दखल घेत असतो. यात हस्तांदोलनाला सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.
’महिला सामान्यत: हस्तांदोलन करणं टाळतात. मात्र, कामाच्या ठिकाणच्या बठका, स्नेहसंमेलनं इत्यादी वेळी हस्तांदोलन करणं उचित ठरतं.
’ओळख करून देताना, निरोप घेताना, कामाचं कौतुक करताना अशा विविध प्रसंगी हस्तांदोलन केलं जातं.
’आपल्याला आपली जी प्रतिमा इतरांपर्यंत पोहोचवायची असते, त्याकरिता आपण हस्तांदोलनाचा वापर कसा करून घेऊ शकतो, हे आपण जाणून घेऊया-
’स्थिर आणि सक्षम हस्तांदोलनातून त्या व्यक्तीचा उत्साही स्वभाव सूचित होतो. मरगळलेल्या किंवा निरुत्साहाने केलेल्या हस्तांदोलनातून नेमका उलट अर्थ निघतो. बसल्या जागी किंवा चेहरा न वळवता हस्तांदोलनासाठी हात पुढे करणं यातून आपली समोरच्याविषयीची अनास्था दिसून येते.
’तळवा वरच्या दिशेने ठेवून केलेल्या हस्तांदोलनातून समोरच्या व्यक्तीपुढे तुम्ही दुय्यमत्व अथवा कमीपणा स्वीकारल्याचं सूचित होतं. त्यामुळे असं हस्तांदोलन करणं टाळावं.
’उलटपक्षी, हस्तांदोलन करताना आपला हात वरच्या दिशेने ठेवण्यातून वरचढपणा दर्शवतो.
’ताठ हातांनी आणि खांद्यांचं अतिरिक्त बळ वापरून केलेल्या योग्य प्रकारच्या हस्तांदोलनामध्ये हाताचा तळवा खालच्या दिशेला असावा.
’मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे दर्शवण्यासाठी काही जण आक्रमकपणे हस्तांदोलन करतात. त्यांचा तळवा खालच्या दिशेने असल्याने तुमचा तळवा वरच्या बाजूला ठेवून हस्तांदोलनाचा स्वीकार करावा लागतो.
’तुमचे वरिष्ठ वगळता कुणीही अशा प्रकारे हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यास त्याला थारा देऊ नका.
’अशा आक्रमक हस्तांदोलनाचा समाचार घेताना हस्तांदोलनासाठी तुमचा हात जरूर पुढे करा. मात्र, त्याच वेळी तुम्ही एक पाऊल पुढे टाका. त्यामुळे समोरच्याला त्याचा हात कोपऱ्यामध्ये दुमडणं भाग पडतं आणि त्याचा तळवा आपोआप सरळ होतो. या पद्धतीऐवजी त्याच्या तळव्याकडे चक्क दुर्लक्ष करून त्याचं मनगट किंवा बोटं वरून पकडता येतील.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

योग्य हस्तांदोलन कसं कराल?
* शक्य असल्यास उभं राहून हस्तांदोलन करा.
* हात कोपरामध्ये ९० टक्क्यांमध्ये वाकवा.
* हस्तांदोलन करताना हातांची पकड मजबूत असावी.
* हस्तांदोलन करताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देणं आणि चेहरा हसरा ठेवणं आवश्यक आहे.
* हस्तांदोलन केल्यावर हात दोनदा-तीनदा हलवून त्यानंतर लगेच सोडून द्या.