News Flash

‘मल्टिटास्किंग करताना..

मल्टिटास्किंग चा स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होतो.

मल्टिटास्किंग

‘मल्टिटास्किंग म्हणजे काय?
एकाच वेळी दोन किंवा त्याहूनही अधिक कामे यशस्वीपणे पार पाडण्याची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता म्हणजेच मल्टिटास्किंग
आजच्या स्पध्रेच्या युगात कौशल्यवापराच्या कक्षा रुंदावल्याचे लक्षात येते. एखाद्या कामगारापासून आस्थापनेतील व्यवस्थापकीय संचालकापर्यंत सर्वच व्यक्ती मल्टिटास्किंग या कौशल्याचा वापर दिनक्रमात करताना दिसतात.
‘मल्टिटास्किंग ची गरज
*कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी खर्चात उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी    ‘मल्टिटास्किंग स्किल्स’ अंगी बाणवणे ही आजच्या कॉर्पोरेट जगताची गरज बनली आहे.
*आज विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांकडून एकाचवेळेस बहुविध जबाबदाऱ्या सांभाळण्याची अपेक्षा केली जाते. त्याकरता  वेगवेगळ्या क्षमता, एकाचवेळेस अनेक कामे करण्याची कर्मचाऱ्याची तयारी आहे का, हे नोकरी देताना तपासले जाते.
* उदाहरणार्थ- एखाद्या कंपनीतील स्वागतकक्षात काम करणारी व्यक्ती, कंपनीकडे येणाऱ्या अभ्यागतांनाही सांभाळू शकते,  कामानिमित्त कंपनीत येणाऱ्या दूरध्वनींना उत्तरे देऊ शकते, तसेच रिकाम्या वेळात कागदपत्रांचे फायिलग, संगणकावर डेटा  एन्ट्रीही करू शकते.
वेळेचे नियोजन महत्त्वाचे!
एकाचवेळी विविध जबाबदाऱ्या कौशल्याने पार पाडण्याकरता महत्त्वाचे ठरते ते वेळेचे प्रभावी नियोजन. हाती असलेला उपलब्ध वेळ आणि आटोपण्याची कामे यांची योग्य सांगड घातली गेली तरच एकाच वेळी एकापेक्षा अधिक कामे पूर्ण करणे शक्य होते.
‘मल्टिटास्किंग’चा अतिताण कमी व्हावा, म्हणून..
*कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या स्वरूपाबाबत स्पष्टता ठेवावी. आपल्या वरिष्ठांना वाढलेल्या कामाच्या दबावाची जाणीव  करून द्यावी आणि पार पाडणे शक्य असेल इतपतच जबाबदारी स्वीकारावी.
*मल्टिटास्किंग करताना कामाचा दर्जा घसरू नये, म्हणून काम करताना काही वेळाने
ब्रेक घ्यावा.
*व्यवस्थापन कौशल्ये शिकल्यास ‘मल्टिटास्किंग’ करणे सुलभ जाते.
हे कौशल्य अंगी बाणवण्यासाठी..
दृष्टिपथातील कामांची नोंद करा- दिवसभरातील किंवा आगामी आठवडय़ात आटोपावी लागतील अशा कामांची यादी जर नजरेसमोर असेल तर, एक काम करत असतानाच दुसऱ्या कामाची पूर्वतयारी करणे शक्य होते. यामुळे दिवसभरातील कामाचा लेखाजोखा मांडणे शक्य होते.
प्राधान्यक्रम – नोंद केलेल्या कामांपकी कोणती कामे अति महत्त्वाची आणि तात्काळ करायची आहेत यांचा निर्णय घेणे महत्त्वाचे! त्यांतील कोणती कामे परस्परांवर अवलंबून आहेत किंवा पूरक आहेत याविषयी योग्य विचार झाल्यास, कोणकोणती कामे एकाच वेळी करता येतील हे ठरवणे शक्य होईल.
कामांची विभागणी – हातातील मोठय़ा कामांची विभागणी लहान-लहान कामांत केल्यास काम वेळेत पूर्ण करणे सोपे होऊ शकते.
कामाचे हस्तांतरण – विभागलेली कामे हाताखालील व्यक्तींना किंवा संबंधित सहकाऱ्यांना वाटून दिल्यास, सर्वाच्या सहभागामुळे निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळात, एकाच वेळी निरनिराळी कामे पूर्ण
होऊ शकतात.
एकाग्रता – हातात घेतलेल्या कामांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे! भोवताली घडणाऱ्या घटनांमुळे विचलित न होता शांतचित्ताने काम केल्याने कामाचा उरक वाढतो.
आजकाल कामाच्या ठिकाणी ‘सर्व कामे सर्वाना जमायला हवीत’ या व्यवस्थापनाच्या सुप्त हेतूमुळे, प्रत्येकावर कार्यालयातील सर्व प्रकारची कामे शिकून घेण्याची आणि पार पाडण्याची जबाबदारी असते. याचा परिणाम म्हणून काही वेळा ‘मल्टिटािस्कग’ कौशल्यांचा अतिवापर होण्याची शक्यता उद्भवते.
‘मल्टिटािस्कग’चे फायदे
वेळेची बचत – एकाच वेळी एकाहून अधिक कामे पार पाडता आल्यास, अर्थातच वेळेची बचत शक्य होते. या वाचलेल्या वेळेचा उपयोग अन्य कामे करण्यासाठी होऊ शकतो.
आíथक बचत – ‘मल्टिटास्किंग चे कौशल्य असलेले कर्मचारी, एकाच वेळी अनेक कामे करून कंपनीच्या मनुष्यबळावर होणाऱ्या खर्चाची बचत करतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी माणसे नेमण्याचा त्रास आणि खर्च यामुळे वाचू शकतो.
उत्पादन क्षमतेत वाढ – कर्मचाऱ्यांच्या ‘मल्टिटास्किंग कौशल्यामुळे उत्पादन खर्चाची बचत आणि उत्पादन वेळेतील बचत, यामुळे साहजिकच कंपनीच्या एकंदरीत उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
वेळेचा सदुपयोग – ‘मल्टिटास्किंग कौशल्य अंगी असलेल्या व्यक्ती, नेहमी वेळ सत्कारणी लावताना दिसतात. एकाच वेळी एखादे महत्त्वाचे, तर दुसरे तितकेसे तातडीचे नसलेले काम करून स्वत:ला नेहमी व्यग्र ठेवतात. साहजिकच हे कौशल्य अंगी बाणवल्याने कामचुकारपणाला
आपोआप आळा बसतो.
बहुअंगी कौशल्यांची जोपासना – एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळण्याने व्यक्तिमत्त्वातील बहुविध कौशल्ये नकळत विकसित होण्यास आणि जोपासली जाण्यास मदत होते.
कामातील विरंगुळा – कामातील बदल हा काही वेळा व्यक्तीच्या विरंगुळ्याचे कारण ठरू शकतो. हे कौशल्य जोपासताना कामाचे स्वरूप बदलते राहिल्याने दैनंदिन कामातील एकसुरीपणा कमी होण्यास मदत होते.
स्वतंत्र ओळख – स्पर्धात्मक युगात कामाच्या ठिकाणी ‘मल्टिटास्किंग कौशल्याचा वापर करून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणे शक्य होते.
मल्टिटास्किंग चे कामावर होणारे नकारात्मक परिणाम
वैयक्तिक गुणवत्तेला मारक – एकाच वेळी अधिक कामे करताना, सर्वच कामे ही केवळ कामचलाऊ पद्धतीने आटोपण्याकडे कल वाढू शकतो.
मानसिक ताण – एकाच वेळी अनेक गोष्टी वेळेत पूर्ण करणे अपेक्षित असल्याने काही वेळा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो.
कामाची गुणवत्ता – एकाच वेळी अनेक कामे करताना कामाची गुणवत्ता कायम राखणे कठीण होते. ‘मल्टिटास्किंग’चा ताण खूपच वाढला तर व्यक्तीची अंतिमत: उत्पादनक्षमता कमी होते आणि कामाचा दर्जा घसरतो.
कौशल्य संपादनात अडथळे – ‘मल्टिटास्किंग मुळे हाती असलेला वेळ आणि बुद्धिमत्ता अनेक कामांसाठी खर्च करताना कर्मचाऱ्याला एका विशिष्ट कामात नपुण्य मिळवणे शक्य होत नाही.
*मल्टिटािस्कग’मुळे एकाच कामात लक्ष केंद्रित करता येत नाही, कारण एक काम करताना वारंवार त्यात अडथळे येत  राहतात.
*नव्या गोष्टी शिकता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 2:06 am

Web Title: how we can do multitasking
Next Stories
1 उत्तरपत्रिका लिहिताना..
2 अॅण्ड्रॉइड अॅप डेव्हलपमेंट
3 अडथळ्यांशी शर्यत..
Just Now!
X