शेफ सचिन जोशी

कुरकुरीत. खारट. चीजने लथपथलेले. ‘नाचोस’ हा अमेरिकेत सर्वात जास्त वाटून खाल्ला जाणारा स्नॅक पदार्थ आहे. गंमत म्हणजे हा पदार्थ त्याच्या आविष्कारकर्त्यांच्या नावाने ओळखला जातो. इग्नॅसिओ ‘नाचो’ अनाया यांनी १९४३ साली ही सर्वाना आवडणारी डिश तयार केली. या पदार्थाच्या उत्पत्तीची एक गमतीदार गोष्ट आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसांत अमेरिकेच्या मिलिटरीमध्ये कामाला असलेल्या काही सनिकांच्या पत्नींचा एक ग्रुप एकदा टेक्सासच्या सीमारेषेवर असलेल्या मेक्सिकोमधल्या पिएदरास नेग्रास या लहानशा गावात हिंडायला, फिरायला आणि खरेदीला गेला. या महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी थांबायचे ठरवेपर्यंत सर्व खाण्याची ठिकाणे बंद झाली होती. सुदैवाने त्यांना व्हिक्टरी क्लबमध्ये तिथले मॅनेजर इग्नॅसिओ भेटले. उशीर झाल्यामुळे व्हिक्टरी क्लबच्या मुख्य शेफची त्या दिवसासाठी सुट्टी झाली होती. आदरातिथ्यात निपुण असलेल्या इग्नॅसियोला त्यांना जेवल्याशिवाय परत पाठवणे योग्य वाटले नाही. त्या स्त्रियांसाठी स्वत: एखादी डिश खायला बनवावी असे इग्नॅसियोने ठरवले. स्वयंपाकघरात एक नजर टाकल्यावर त्याने जे मिळेल ते वापरायचे ठरवले. काही टॉर्टयिांचे (मेक्सिकोमधील मक्याच्या पोळ्या) त्रिकोणी तुकडे करून पटकन त्याने कुरकुरीत तळून काढले. मग त्यावर चीज, मिरच्यांचे तुकडे घालून ओव्हनमध्ये अजून काही मिनिटे ठेवले. ओव्हनच्या बाहेर आली ती हीच सर्वाना आवडणारी डिश ‘नाचोस’! इग्नॅसियो हा एक शोमन होता. त्याने हा खास स्नॅक त्या स्त्रियांना कौतुकाने वाढला आणि त्याचे नाव सांगितले ‘नाचोस एस्पेशियल्स’. नाचो हे इग्नॅसियोचे टोपन नाव होते! नुकत्याच झालेल्या ‘इंटरनॅशनल नाचोस डे’ निमित्ताने त्याच्या काही रेसीपीज इथे मांडण्याचा हा प्रयत्न!

क्लासिक नाचोस

’ एका वाडग्यामध्ये कांदा, टोमॅटो, जिरेपूड, कोिथबीर, मेक्सिकन मिरच्या, मीठ आणि मिरपूड एकत्र मिसळा. हा झाला प्राथमिक टोमॅटो साल्सा

’ टोरटिया चिप्सचा एक थर बेकिंग शीटवर पसरा.

’ प्रत्येक चिपवर एक चमचा टोमॅटो साल्सा पसरवा.

’ टोरटिया चिप्सवर भरपूर किसलेले चेडर चीज पसरवा.

’ आता त्यावर दुसरा साल्साचा थर चमच्याने घाला.

’ या टोरटिया चिप्सवर भरपूर किसलेले चीज घाला.

’ चीजला बुडबुडे येईपर्यंत सुमारे पाच मिनिटे गरम ओव्हनमध्ये नाचोस बेक करावे.

’ हे चिप्स गरम सव्‍‌र्ह करावे. त्याबरोबर साल्सा सव्‍‌र्ह करावे.

बाब्रेक्यू चिकन नाचोस

’ दीड कप बार्बेक्यू सॉस आणि अर्धा कप पाणी मिक्स करून उकळावे.

’ उकडलेले चिकनचे बारीक तुकडे करून (चार कप) या मिश्रणात घालून गरम करावे.

’ टोरटिया चिप्सवर बाब्रेक्यू चिकनचा थर द्यावा. त्यावर तीन कप किसलेले चेडर चीज पसरवा.

’ कांद्याचे पातळ काप या थरावर घालून पाच मिनिटे गरम ओव्हनमध्ये नाचोस बेक करावे.

’ हे चिप्स गरम सव्‍‌र्ह करावे. त्याबरोबर बुडवून खाण्यासाठी साल्सा द्यावा.

चिकन टिक्का नाचोस

साहित्य – एक टेबल स्पून तेल, मोठा लाल कांदा बारीक चिरलेला, अर्धा टेबल स्पून गरम मसाला, पाव किलो शिजवलेले बोनलेस

चिकन, वीस गॅ्रम टिक्का मसाला, दोनशे गॅ्रम टोरटिया चिप्स, एक लाल मिरची बारीक चिरून घ्यावी. दोनशे गॅ्रम शेडर चीज (किसलेले), एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती – ओव्हन २२० डिग्री सेल्सियसवर गरम करा. मोठय़ा फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात कांदा घालून परतून घ्या. गरम मसाला घालून मध्यम आचेवर दहा मिनिटे झाकून शिजवा आणि बाजूला ठेवा. चिकन टिकाचे अगदी लहान लहान तुकडे करून घ्या आणि टिका मसालासह एकत्र मिसळा.

मोठय़ा बेकिंग ट्रेमध्ये टोरटिलाचा पॅक पसरवा. त्यावर शिजलेला कांदा पसरवून चिकन टिका मिक्स करा. कारळी चटणी, मिरची आणि शेडर चीज यांचा थर द्या. या थरावर टोरटीलाचा अजून एक थर पसरवा. आणि पुन्हा चिकन टिका, कारळा चटणी, मिरची आणि शेडर चीज यांचा थर द्या. पाच मिनिटे ओव्हनमध्ये बेक करून त्यावर मूठभर बारीक चिरलेली कोिथबीर घाला.

पाव-भाजी नाचोस

’ टोरटिया चिप्सचा एक थर बेकिंग शीटवर पसरा.

’ तयार पाव भाजीचा टोरटिया चिप्सवर थर द्यावा.

’ त्यावर भरपूर किसलेले चेडर चीज पसरवा.

’ बारीक चिरलेला कांदा व लोणी या थरावर घालून पाच मिनिटे गरम ओव्हनमध्ये नाचोस बेक करावे.

’ हे चिप्स गरम सव्‍‌र्ह करावे. त्याबरोबर बुडवून खाण्यासाठी साल्सा द्यावा.