तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

काही कादंबऱ्या या फक्त तरुणांसाठीच असतात असं मला वाटतं. जे. के. रॉलिंगच्या ‘हॅरी पॉटर’ या कादंबरीबद्दल मला स्वत:ला तेच वाटतं की, या कथा आमच्या पिढीच्याच दृष्टीने लिहिलेल्या आहेत, किंबहुना हॅरी पॉटर उच्चारलं तरी आजच्या तरुणांना म्हणजे आम्हालाच तो ‘कळतो’ असा सगळ्यांचा समज आहे. मैत्री, त्याग आणि आपल्या प्रियजनांसाठी दाखवलेले धाडस हे फक्त या ओळीतूनच नाही तर पूर्ण हॅरी पॉटर मालिकेतून ते व्यक्त होते. आज या शब्दांची जागा दुश्मनी, अहंकार आणि भीतीने घेतली आहे; पण या तिन्ही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे प्रेम. ‘लव्ह इज द मोस्ट पॉवरफुल मॅजिक’ हा विचारच आजचे तरुण विसरतात. प्रेमाच्या स्पर्धेत धावतात. हॅरीचे आई-बाबा ते हयात नसतानाही त्याचे त्यांच्यावर असणारे प्रेम विशेषत: वॉल्डमोर्ट या खलनायकाचे ब्लॅक मॅजिकही हॅरीवर चालत नाही इतकं त्यांचं हॅरीवर असलेलं प्रेम शक्तिशाली आहे हे या कादंबरीत लेखिकेने वारंवार अधोरेखित केलं आहे. मुळात ही फॅन्टसी आहे मान्य, पण यात जो विचार आहे तो आपल्या सर्वाना लागू होतो, खास करून तरुणांना! याचं कारण आजच्या युगातही त्यांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळवायचे असते; पण तो फक्त त्यांचा वेळ खर्च करून चाललेला निव्वळ मोठेपणा वाटतो. काही क्षणिक वाटणारे, काही काळ अभिमानाप्रमाणे वाटणारे ते प्रेम असते. प्रेमाचा अर्थ म्हणजे काहींना आम्ही किती एकमेकांवर प्रेमाचा वर्षांव करतो हे फक्त ‘सोशली’ मिरवण्याइतपतच असते. ही ओळ त्यांनी वाचली पाहिजे. आज आमच्या वयातील तरुणांमध्ये प्रेमात फसवणूक, युद्ध, स्पर्धा, द्वेष ओतप्रोत भरलेलं आहे. प्रेम म्हणजे फक्त एका मुलावर किंवा मुलीवर प्रेम करणं इतकंच नाही. तर आपले पालक, शिक्षक, आजी-आजोबा, बहीणभाऊ, एखादा मित्र हेही आपल्यावर प्रेम करतात, मग आपण (तरुण) त्यांच्या प्रेमाचा विचार कितपत करतो? त्यांच्याही प्रेमाचा आदर करणं व त्यांच्यावरही तितकंच प्रेम करणं महत्त्वाचं आहे. सत्तेत प्रेम नसतं, कारण तिथे काहीही करून जिंकायचं असतं, पण सत्ता ही भावनाच किती विचित्र आहे. यश आणि सत्ता या दोन्ही गोष्टी वाया जातात जेव्हा आपण कोणासाठी प्रेम व्यक्त करू शकत नाही, दया दाखवू शकत नाही आणि कोणासाठी त्यागसुद्धा करू शकत नाही. आपली संस्कृती इतकी बदलतेय की, आपल्यावर प्रेम करण्यापेक्षा किंवा दोन गोड शब्द आदराने बोलण्यापेक्षा दादागिरीचीच वागणूक मिळते. प्रेम तर सोडाच, पण माणुसकी आज तरुणांनी अंगी बाळगलीच पाहिजे. या ओळीत हेच म्हटलं आहे, पण इथे हॅरीला हा विचार पटवून द्यायला त्याच्यावर भरभरून प्रेम करणारे मुख्याध्यापक डम्बलडोर होते. आपल्या तरुणांसाठी असा मार्गदर्शक कोण आहे?

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”