वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

‘बच्चन’ वाचून आश्चर्य वाटलं असेल तर ते साहजिक आहे. पण हा ‘आज खूश तो बहोत होंगे तुम..’ वाला बच्चन नाही किंवा ‘लॉक किया जाए?’ वाले बच्चन पण नाहीच नाही. खरं तर हे जे बच्चन आहे त्याला ‘बच्चन’च का म्हणतात यामागे पण काही शास्त्रीय वगैरे कारण नाही. या बच्चनला समानार्थी ‘टोचन’ हा शब्द पण वापरला जातो. हे दोन्ही शब्द ‘जा रे, जास्त शहाणपणा शिकवू नको’ किंवा ‘बापाला शिकवू नको’ किंवा ‘फुकटचे सल्ले नकोयत’ अशा काहीशा अर्थानी वापरले जातात. बच्चन देणे किंवा टोचन देणे म्हणजे अक्कल शिकवणे! तसा दोन्हीचा अर्थ वरवर सारखा असला तरी त्याच्या अर्थछटांमध्ये हलकासा फरक आहे.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….

बच्चन देणे म्हणजे सल्ले देणे, पण ते फुकटचे ! फुकटचे म्हणजे विचारलेले नसताना.. सल्ले देणारा माणूस इतरांना जी अक्कल शिकवतो त्याप्रमाणे स्वत: वागत नसून फक्त लोकांना सांगायला ती अक्कल उपयोगात आणत असतो तेव्हा त्याला ‘बोलबच्चन’ म्हणतात आणि त्या बोलबच्चनचंच हे छोटेखानी क्रियापद रूप – ‘बच्चन देणे’! त्यामुळे बच्चन देणे हा मोठेपणा नसून ‘इतरांना गरज नसलेली वायफळ बडबड’ असा आहे. या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करताना कधीच ‘मी बच्चन देतो’ असा प्रथमपुरुषी न करता नेहमी ‘तो बच्चन देतो रे फक्त’ असा दुसऱ्यांबद्दल म्हणजेच द्वितीयपुरुषी केला जातो. मात्र तरीही या बच्चनचा आणि खऱ्याखुऱ्या कोणत्याच बच्चनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

यासमान असणारा टोचन म्हणजे डॉक्टर इंजेक्शन देतात तसं टोचणं किंवा सोनाराने कान टोचल्यासारखं टोचणं. अनेकदा टोचन हा प्रकार स्वत:ला अतिशहाणे आणि जगाला मूर्ख समजणाऱ्या व्यक्तींकडून दिला जातो. टोचन देण्यामध्ये फुकटचे सल्ले ही छटा नसून ‘बाप को मत सिखा’ हा अ‍ॅटिटय़ूड असतो. त्यामुळे टोचन आणि बच्चन यात फरक आहे. तरुणाईला दोन्ही पसंत असले तरी समवयस्कांच्या बाबतीत बच्चन आणि मोठय़ांनी कानउघाडणी केली आणि ती पटली नाही की त्याला टोचन म्हटलं जातं.