व्हिवा लाउंजच्या मंचावर प्रथमच वित्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रीला निमंत्रित करण्यात आलं होतं. यूटीआयच्या फंड मॅनेजर स्वाती कुलकर्णी यांनी गुंतवणुकीसारख्या किचकट विषयाची सोप्या शब्दांत उकल करण्याचा प्रयत्न केला. म्युच्युअल फंडबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर फंड मॅनेजर, शेअर मार्केटचे अभ्यासक, गुंतवणूक सल्लागार यांच्या कामाबाबत, या क्षेत्रातील संधींबाबतही माहिती समजली. कार्यक्रमाला उपस्थित तरुणाईच्या या संदर्भातील काही निवडक प्रतिक्रिया.
vv19

लोकसत्ताने आयोजित केलेला आजचा व्हिवा लाउंज कार्यक्रम खूप vv14वेगळ्या विषयावरचा होता. अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी स्वाती कुलकर्णी यांनी शक्य तेवढय़ा सोप्या भाषेत सांगितल्या. मी स्वत: कॉमर्स क्षेत्रातील आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे वेगवेगळे आस्पेक्ट्स या कार्यक्रमातून उलगडले. मला आजच्या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल.
 श्वेता मेहेंदळे

vv15‘यूूटीआय’च्या फंड मॅनेजर स्वाती कुलकर्णी यांनी म्युच्युअल फंड्सच्या संदर्भातली खूप सविस्तर माहिती दिली. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. गुंतवणुकीतून प्रॉफिट कसं मिळवता येईल हे तर कळलंच, पण गुंतवणूक या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन क्लीअर झाला.
 मैत्रेय चिपळूणकर

vv16मी इकोनॉमिक्समधून मास्टर्स करत आहे. आजच्या कार्यक्रमाचा मला खूपच फायदा झाला. आम्ही तरुण पिढी फंड्समध्ये कशा प्रकारे इनव्हेस्ट करू शकतो त्याबद्दल छान माहिती मिळाली. फंड मॅनेजर म्हणजे काय तेही कळलं. या क्षेत्रातल्या संधीही समोर आल्या. हा एक करिअर ऑप्शन असू शकतो हे समजलं. याचा नक्कीच फायदा होईल.
 ऋतुजा चौघुले

vv17आत्ताच मी कॉमर्सचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. स्वाती कुलकर्णी यांनी अगदी बेसिक लेव्हलपासून फंड मॅनेजमेंटबद्दल सांगितलं. त्याचबरोबर म्युच्युअल फंड किंवा इतर क्लिष्ट टम्र्स त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या. असा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम ‘लोकसत्ता व्हिवा’ने आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार.
– सायली फालक

vv18फंड मॅनेजर नेमकं काय करतो, सामान्य गुंतवणूकदार म्हणून कसलं भान ठेवलं पाहिजे, याविषयी माहिती मिळाली. आजचा व्हिवा लाउंज फार वेगळ्या पद्धतीचा, माहितीपूर्ण झाला. बरीच नवीन माहिती मिळाली. याचा नक्कीच फायदा होईल.
– शार्दूल खरे

शब्दांकन : प्राची परांजपे. छाया : अमृता अरुण

व्हिवा लाउंज या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive व्हिडीओ लिंकला क्लिक करा.