News Flash

आली नवीन Honda City , फीचर्स आणि किंमत काय ?

मारुती सुझुकी सियाज, ह्युंदाई वर्ना, फोक्सवॅगन वेंटो आणि स्कोडा रॅपिड यांसारख्या कारसोबत स्पर्धा

‘होंडा कार्स इंडिया लिमिटेड’ने (HCIL) मंगळवारी आपली प्रीमियम सिदान कार होंडा सिटी BS -6 पेट्रोल व्हेरिअंट लाँच केली. BS6 इंजिनसह होंडा सिटी पेट्रोल व्हर्जनच्या विविध व्हेरिअंटची किंमत 9.91 लाख ते 14.31 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. अपग्रेडेड डिझेल व्हेरिअंट देखील लवकरच लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ‘मिड-साइज सिदान सेगमेंट’मध्ये BS-6 मानकांसह लाँच झालेली होंडा सिटी पहिलीच कार ठरलीये.

मायलेज किती?   
नव्या होंडा सिटीमध्ये 1.5 लीटर, 4 सिलिंडर, वॉटर कुल्ड, SOHC, i-VTEC पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 119 PS ऊर्जा आणि 145Nm पीक टॉर्क निर्माण करतं. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याशिवाय नव्या होंडा सिटीमध्ये CVT पर्याय देखील आहे. मॅन्युअल आणि CVT व्हेरिअंटचा मायलेज अनुक्रमे 17.4 किलोमीटर प्रतिलीटर आणि 18 किलोमीटर प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. यापूर्वी होंडाच्या CR-V पेट्रोल आणि होंडा सिविक या कार नव्या मानकांसह बाजारात आल्या आहेत. भारतीय बाजारात या नव्या कारची, मारुती सुझुकी सियाज, ह्युंदाई वर्ना, फोक्सवॅगन वेंटो आणि स्कोडा रॅपिड यांसारख्या कारसोबत स्पर्धा असेल. होंडा सिटीच्या V, VX आणि ZX व्हेरिअंट्समध्ये आधुनिक इंफोटेनमेंट सिस्टिम Digipad 2.0 चा वापर करण्यात आला आहे. यात 17.7cm टचस्क्रीन ऑडिओ, व्हिडिओ आणि नेव्हिगेशन सिस्टिम आहे. अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचा पर्यायही आहे. याशिवाय इन-बिल्ट सेटेलाइट-लिंक्ड टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, USB वाय-फाय रिसीवरद्वारे लाइव्ह ट्रॅफिक सपोर्ट, व्हॉइस कमांड फीचर आहेत.

आणखी वाचा- Yamaha ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक R15 , बीएस-6 इंजिनसह झाली लाँच

किंमत ? 
BS6 इंजिन होंडा सिटी SV MT व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.91 लाख रुपये, सिटी V MT ची किंमत 10.66 लाख रुपये (एक्स-शोरूम) , होंडा सिटी VX MT व्हेरिअंटची किंमत 11.82 लाख रुपये, सिटी ZX MT एक्स-शोरूम किंमत 13.01 लाख रुपये, होंडा सिटी V CVT व्हेरिअंटची किंमत 12.01 लाख रुपये, तर सिटी VX CVT आणि ZX CVT ची अनुक्रमे किंमत 13.12 लाख आणि 14.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 11:15 am

Web Title: bs6 honda city petrol launched at rs 9 91 lakh know specifications sas 89
Next Stories
1 64MP चा शानदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro चा आज फ्लॅशसेल
2 आता नाही विसरणार कोणतंच काम, Whatsapp देईल आठवण
3 Jio ने 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये केला बदल, आता मिळणार या सुविधा
Just Now!
X