एकेकाळी फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळणारी अंजीर आता वर्षातील सहा महिने मिळतात. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.

पाहूयात अंजीरचे खाण्याचे फायदे 

– पोट साफ करायचं असेल तर अंजीर खावे. कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.

– अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

– शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर हे थंड असते.

– जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.

– पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.

– आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.