Huawei कंपनीने भारतातील आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Huawei Y9 Prime 2019 गेल्या आठवड्यातच लाँच केला होता. आज(दि.7) या स्मार्टफोनसाठी खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून या सेलला सुरूवात झाली आहे. पण, Amazon Freedom Sale अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सेल केवळ अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्ससाठीच आहे. इतर सामान्य ग्राहकांसाठी मध्यरात्री 12 वाजेपासून हा फोन खरेदी करता येईल.

ऑफर –  या सेलमध्ये काही खास आकर्षक ऑफर्स देखील आहेत. यानुसार Amazon Pay द्वारे फोन खरेदी केल्यास 500 रुपये कॅशबॅकची ऑफर आणि सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय आहे. तसंच एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के सवलत मिळेल. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या रिलायंस जिओच्या ग्राहकांना 2 हजार 200 रुपये कॅशबॅक आणि 125GB 4G इंटरनेट डेटाची ऑफर आहे. याशिवाय 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे.

हा स्मार्टफोन म्हणजे ‘पॉप-अप किंग’ असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम+128GB स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. 15 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. भारतात सध्या असलेल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन्सच्या किंमतीच्या तुलनेत Huawei Y9 Prime 2019 ची किंमत सर्वात कमी आहे.

Huawei Y9 Prime 2019 स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा फुल HD+ TFT डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710 प्रोसेसर असलेल्या या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे 8 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. Y9 Prime 2019 स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलीजंस (AI) पावर्ड कॅमरा अॅप्लीकेशन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh क्षमतेची बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यू-टूथ, GPS/A-GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.