काही दिवसांपूर्वीच टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर आता रिलायंस जिओने ‘जिओ फोन’च्या प्लॅनमध्येही बदल केलेत. आता जिओ फोनच्या ग्राहकांना सर्वांत स्वस्त 49 रुपयांचा प्लॅन उपलब्ध होणार नाही. कारण कंपनीने हा प्लॅन हटवला असून त्याऐवजी आता 75 रुपयांचा प्लॅन हा सर्वात कमी किंमतीचा असेल.

आणखी वाचा- कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वापरता येणार एअरटेलची ‘ही’ नवी सेवा

75 रुपयांचा हा प्लॅन काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या ‘ऑल-इन-वन प्लॅन’चाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. ‘टेलिकॉमटॉक’च्या रिपोर्टनुसार, 75 रुपयांच्या प्लॅनसह 99 रुपये, 153 , 297 आणि 594 रुपयांचेही प्लॅन्स देखील रिचार्जसाठी उपलब्ध आहेत. परंतू युजर्सला नॉन-जिओ कॉलिंगसाठी अतिरिक्त IUC टॉप-अप रिचार्जसाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

आणखी वाचा- Jio ने 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये केला बदल, आता मिळणार या सुविधा

49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, मोफत अमर्यादित कॉलिंग अशा सुविधा होत्या. तर आता आता 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित जिओ-टू-जिओ कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 500 मिनिटं, दररोज 100mb इंटरनेट डेटा आणि 50 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधताही 28 दिवस इतकीच आहे.