scorecardresearch

Premium

Airtel, Jio आणि Vi चे ५६ दिवसांसाठीचे सर्वोत्तम प्लॅन्स! किंमत ५०० रुपयांपेक्षाही कमी 

एअरटेल, जिओ आणि व्हीआय आपल्या ग्राहकांना या ५६ दिवसांच्या प्लॅनमधून नेमक्या कोणकोणते फायदे देतायत? पाहुयात

Airtel Jio Vi Best Plans for 56 Days Price less than rupees 500 gst 97
Airtel Vs Jio Vs Vi प्रीपेड प्लॅन्स. तुम्हाला कोणता प्लॅन वाटतोय सर्वोत्तम? (Photo : File)

एअरटेल, जिओ आणि व्हीआय (Airtel, Jio, Vi) या तिन्ही कंपन्यांनी आता ५६ दिवसांच्या वैधतेसह आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. त्यांची किंमत देखील जास्त नाही. या प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉल, एसएमएस आणि स्ट्रीमिंगच्या फायदे डेटासह दिले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगत आहोत. या तिन्ही कंपन्यांच्या सर्व योजनांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे आणि वैधता एकूण ५६ दिवसांची आहे. पाहुयात, हे प्लॅन्स

Jio चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता ५६ दिवस आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि दररोज १०० एसएमएसचा फायदा मिळेल. यासह जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन देखील दिलं जाईल.

Jio चा ४४४ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या ४४४ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा अमर्यादित कॉल आणि दररोज १०० एसएमएसचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता देखील ५६ दिवसांची आहे. यामध्ये जिओ अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जाईल. जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील असाच आहे. त्या प्लॅनमध्ये ४४४ रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे उपलब्ध आहेत. परंतु त्यात यांसह डिस्ने + हॉटस्टारचं व्हीआयपी सबस्क्रिप्शन देखील एका वर्षासाठी दिलं जात आहे.

Airtel चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यासह, अमर्यादित कॉल आणि ५६ दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये, दररोज ग्राहकांना १०० एसएमएस देखील मिळतात. त्याचबरोबर या योजनेसह ग्राहकांना प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन, एअरटेल एक्सस्ट्रीम आणि विंक म्युझिकचं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.

Airtel चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्याची देखील वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ३९९ रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे देण्यात आले आहेत.

Vi चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यासह, अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएसचा फायदा देखील दिला जात आहे. हा प्लॅन वीकेंड रोल ओव्हर डेटा बेनिफिटसह येतो. या प्लॅनद्वारे, Vi मुव्हीज आणि TV वर एक्सेस मिळू शकतो. हा प्लॅन ऑल नाईट ऑफरसह येतो.

Vi चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ४ जीबी डेटा ५६ दिवसांसाठी डबल डेटा ऑफरसह दररोज दिला जातो. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एमएमएससह येतो. या प्लॅनसह वीकेंड रोलओव्हर डेटा आणि बिंज ऑल नाईट ऑफर देखील देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Airtel jio vi best plans for 56 days price less than rupees 500 gst

First published on: 16-08-2021 at 17:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×