Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022 : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात साजरी होतेय. गेल्या दोन वर्षात जगभरात करोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे सगळ्यात सण-उत्सवांवर विरजण पडले होते. गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती. दरवर्षी धुमधडाक्यात सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर करोनाचं सावट आलं होतं. मात्र या वर्षी करोनाचं संकट ओसरलं असल्यानं तब्बल दोन वर्षानंतर यंदाची भीम जयंती पहिल्यासारखीच धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. असं असलं तरीही करोनाला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून यंदाची भीम जयंती सुरक्षितपणे साजरी करूय. तसंच भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारे WhatsApp Messages, Status, Quotes, डॉ. आंबेडकरांचे प्रेरणादायी वाक्य, Facebook Post तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारमधील लोकांना पाठवून यंदाच्या भीम जयंतीचा आनंद आणखी द्विगुणीत करा.

Ambedkar Jayanti 2022 Messages In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छा

राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘हे’ ९ प्रेरणादायी विचार शेअर करून द्या भीमजयंतीच्या शुभेच्छा!
Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
dr babasaheb ambedkar marathi news, ambedkar architect of indian constitution marathi news
डॉ. आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात, कारण…

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यानं
नसा नसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम!!!

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शतः शतः नमन चरणी त्यांचे…
असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भीम!!!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले,
अरे या मूर्खांना अजून कळत कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!

हवा वेगाने नव्हती
हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता….!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम || जय शिवराय

जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!

भीमजयंती #जय_भीम

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरांसारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
जय भीम….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक,धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न, ?डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व मानाचा जयभीम..!!?

Bhim Jayanti 2022 Status In Marathi | भीम जयंती २०२२ मराठी स्टेटस

होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान अर्थतज्ञांची जयंती आहे.
?भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके
वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय….
?भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.
?डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
??डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.??

काळ कसोटीचाआहे
पण कसोटीला सांगा
वारसा आहे संघर्षाचा…
ही जयंती नाचून
नाही तर वाचून
साजरी करुया..!?

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा.??

Bhim Jayanti 2022 Quotes In Marathi | भीम जयंती २०२२ मराठी कोट्स

एक महान माणूस
प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा
असतो की तो
समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
स्वत:ची कुवत विद्यार्थी दशेतच वाढवा.

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण
तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात
न घेता लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा.

अस्पृश्यता जगातील सर्व
गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे.

तुम्ही वाघासारखे बना
म्हणजे तुमच्या
वाट्याला कोणीही जाणार नाही.

यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
सेवा जवळून,
आदर दुरून
आणि ज्ञान आतून असावे.

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.

मी समाजकार्यात,
राजकारणात पडलो
तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे.

शंका काढण्यास देखील
ज्ञान लागतं.

कायदा व सुव्यवस्था हे राजकीय
शरीराचे औषध आहे आणि
जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते
तेव्हा औषध दिले पाहिजे.

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात.

शक्तिचा उपयोग वेळ –
काळ पाहून करावा.

अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

माणसाला आपल्या दारिद्र्याची
लाज वाटता कामा नव्हे;
लाज वाटायला हवी ती आपल्या
अंगी असलेल्या दुर्गुणांची.
पती-पत्नीमधील नातलगाचे
नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे
‘हुकूमशाही’ आणि
माणसां-माणसांत भेद
मानणारी ‘संस्कृती’.

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक
किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे
सहजीवन राहण्याची पद्धती.

शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे
आणि जो ते प्राषण करेल तो
वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.