काही वर्षांपूर्वी जुरासिक पार्क नावाचा त्यात डायनॉसॉरचे क्लोिनग करून त्यांची पिले जन्माला घातल्याचा एक प्रसंग होता. आता ब्रिटनमधील लिव्हरपूलच्या जॉन मूर विद्यापीठाने डायनॉसॉरच्या जीवाश्मातून त्याचे डीएनए मिळवून त्याचे क्लोनिंग केले आहे. त्या क्लोन केलेल्या डायनॉसॉरला अपोटोसॅरस असे नाव देण्यात आले. त्याचे लाडाचे नाव स्पॉट असे ठेवण्यात आले. सोशल नेटवर्किंग साईटवरही ही बातमी पसरली. वैज्ञानिक जगातही क्षणभर खळबळ उडाली, पण अखेर ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे.
ट्विटरवरही ही बातमी गुगलीसारखी फिरली. न्यूज हाउंड ओआरजी या संकेतस्थळावर बेमालूमपणे देण्यात आलेल्या लेखात असेही म्हटले आहे, की वैज्ञानिक जगतात डायनॉसॉरच्या क्लोनिंगच्या बातमीने खळबळ उडाली आहे व जैवअभियांत्रिकीतील मलाचा दगड म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. याच संकतेस्थळावर जहाज फुटल्यानंतर एका महिलेला गुगलअर्थने कसे वाचवले याचीही बातमी आहे, ती पूर्वी काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धही केली आहे पण ती प्रत्यक्षात थाप आहे.  त्या लेखात त्यांनी डायनॉसॉरच्या पिलाचे जे छायाचित्र टाकले आहे ते चक्क कांगारूच्या पिलाचे आहे. विद्यापीठातील वैज्ञानिक म्हणून जेमा शेरिडन यांचे अवतरण देण्यात आले आहे. त्यांच्या मते त्यांनी प्रयोगशाळेत आपण हा प्रयोग केला आहे. जे चित्रपटात घडते ते प्रत्यक्षात का घडवता येऊ नये ही प्रेरणा त्यामागे होती असेही त्या म्हणतात. पण ते नावही खोटे आहे. यात त्यांना रसायनशास्त्राच्या प्राध्यापक दाखवले आहे. गुगलअर्थ बातमीत जहाज फुटलेल्या घटनेतील स्त्री म्हणजे जेमाच आहेत. सोशल मीडियावर या बातमीची बरीच चर्चा झाली. काहींना डायनॉसॉरचे क्लोिनग खरे वाटले.
ज्युरासिक पार्कमध्ये या चित्रपटात एक कल्पना म्हणून असे दाखवले होते, की डायनॉसॉरचे जे रक्त डासांनी प्यायलेले होते त्या डासांचे तलस्फटिकातील जीवाश्म घेऊन त्यापासून डायनॉसॉरच्या रक्तातील प्राचीन डीएनए परत मिळवण्यात आले व त्यापासून त्यांचे क्लोिनग करण्यात आले. प्रत्यक्षात वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी ज्युरासिक पार्कमधील डायनॉसॉरच्या शवपेटीला अखेरचा खिळा मारून असे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे सांगितले होते. मँचेस्टर विद्यापीठातील वैज्ञानिकांनी कीटकांमध्ये असलेल्या डायनॉसॉरच्या डीएनएचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंतच्या प्राचीन जीवांपासून डीएनए मिळवण्याच्या आधुनिक पद्धती वापरूनही ते शक्य झाले नव्हते. ते मिळवण्याचा प्रयत्न करीत होते ते ६० ते १०६०० वर्षांपूर्वीचे होते. यात एक बाब अशी, की कोटय़वधी वर्षांपूर्वीचे डीएनए वातावरणाच्या माऱ्यात टिकण्याइतके कणखर नसतात. त्यांचा अर्धआयुष्यकाळ हा ५२१ वष्रे असतो. पर्यावरणातील तापमान, जीवाणू, ऑक्सिजिनेशन या धबडग्यात डीएनएचा ऱ्हास होतो, त्यामुळे प्राचीन डीएनए मिळवणे शक्य नसते. टाइम मशीन कधीकाळी बनवता येईल, पण जीवशास्त्रातील काळाची चक्रे अशी उलटी फिरवता येणार नाहीत.

ज्युरासिक पार्क
१९९३ मध्ये स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटाने त्या काळात आबालवृद्धांना पृथ्वीवर कधीकाळी असलेल्या डायनॉसॉरसारख्या अक्राळविक्राळ प्राण्याचे पडद्यावर दर्शन घडवून धमाल केली होती. त्यात डायनॉसॉरचे क्लोिनग करून त्यांना जिवंत केले जाते अशी एक विज्ञान काल्पनिका होती व ती लोकप्रिय ठरली, त्यामुळे आताची बातमी थोडी खरी वाटण्यामागे ते एक कारण होते. या चित्रपटाने जगभरात ९० कोटी डॉलरची कमाई केली होती. त्या चित्रपटात डासांपासून डायनॉसॉरचे डीएनए मिळवल्याचे दाखवले होते. कारण डास डायनॉसॉरचे रक्त पीत असत. डायनॉसॉर नष्ट झाले तेव्हा डास व इतर रक्त पिणारे कीटक अडकून पडले व त्यांचे जीवाश्मीकरण ही दुर्मिळ घटना आहे. परिणामी, डासांच्या जीवाश्मातून डायनॉसॉरचे रक्त मिळवून त्यातून डीएनए प्राप्त केल्याचा दावा चुकीचा आहे.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस