Health Benefits Of Onions : जगभरातील बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे कांदा हा आहारातील मुख्य पदार्थांतील पूरक घटकांपैकी एक मानला जातो. अगदी बर्गरपासून ते भारतात वाटणाची भाजी बनविण्यापर्यंत कांद्याचा वापर केला जातो. कांद्यामुळे पदार्थाला एक वेगळी चव येते. पण, अनेकांना त्याची चव आवडत नाही किंवा कच्चा कांदा नुसताच खाल्ला, तर तोंडाला वास येत असल्याने कांदा तसा खाणे टाळले जाते. अशा परिस्थितीत लोकांनी जर आहारात महिनाभर कांदा न वापरण्याचा विचार केला, तर शरीरात काय बदल होतील याचा कधी विचार केला आहे का? त्यावर इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ स्वाती यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कांदा खाण्याचे फायदे काय आहेत याविषयी माहिती दिली आहे

पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत

आहारतज्ज्ञ स्वाती यांच्या मते, कांद्यामध्ये अनेक जीवनावश्यक पौष्टिक घटक आहेत. कांद्यातील जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स घटक आहेत जे तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर

१) जीवनसत्त्वांची ताकद

कांदा हा जीवनसत्त्व क, ब६ व फोलेटचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पेशींची वाढ आणि चयापचय क्रियेसाठीही महत्त्वपूर्ण मानले जाते.

२) अँटिऑक्सिडंट्स घटक

कांद्यामध्ये ॲलील प्रोपिल डायसल्फाइड यांसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स घटक असतात; तसेच दाहकविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

३) फायबर फेअरवेल

कांदा हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे; जो निरोगी पचनसंस्थेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे कांदे सेवन न केल्यास फायबरचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा इतर पचनाशी संबंधित समस्या उदभवू शकतात.

४) कमी दाहक शक्ती

कांद्यामध्ये अॅलिसिन व क्वेर्सेटिन असते; ज्यात दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. या संयुगाशिवाय तुमचे शरीर जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावासाठी अधिक संवेदनक्षम असू शकते; ज्यामुळे कालांतराने जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो. पण IBS किंवा GERD असलेल्या काही लोकांना संभाव्य पचन अस्वस्थतेमुळे कांदा खाणे टाळावे.

महिनाभर कांदा न खाल्ल्यास काय होईल?

महिनाभर कांदा न खाल्ल्यास तुमच्या शरीरात फार मोठे बदल होत नाहीत. फक्त काही सूक्ष्म बदल होऊ शकतात, असे आहारतज्ज्ञ स्वाती म्हणाल्या.

कांदा खाण्याचे तोटे

कांदा हा आवश्यक पोषक घटकांचा खजिना आहे आणि तो तुमच्या आहारातून काढून टाकल्याने काही पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. खासकरून तुमच्याकडे कांद्याला काही पर्याय नाही, असे आहारतज्ज्ञ स्वाती म्हणाल्या.

कांदा न खाल्ल्यास मँगनीज व पोटॅशियम यांसारख्या खनिजांसह जीवनसत्त्वे क, बी६ आणि फोलेटची कमतरता होऊ शकते. स्वाती म्हणाल्या की, याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात; जसे की, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते, थकवा वाढतो आणि रक्त गोठणे व लाल रक्तपेशींत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

कांदा हा तुमच्या आहारातील एक आरोग्यदायी घटक आहे. तो आहारातून पूर्णपणे काढून टाकल्यास शरीरातील महत्त्वाचे पोषक घटक कमी होतात आणि आहारातील विविधता कमी होऊ शकते.

स्वाती यांनी सल्ला दिला की, बहुतेक लोकांना आहारात कांद्याचा समावेश करणे ही बाब तोट्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. पचनाच्या समस्यांमुळे तुमच्या आहारात त्याचा समावेश करण्याबाबत तुम्हाला चिंता असल्यास तुम्ही आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.