Gardening Tips and Tricks : तुमच्यापैकी अनेक जण घरातील गॅलरी किंवा घराबाहेरील बागेत विविध प्रकारची आवडीची रोपं लावतात. पण, काही दिवस सर्व रोपं व्यवस्थित वाढत असताना अचानक त्यावर काळे कीटक आणि पांढरी बुरशी (मिलिबग्स) पडते. पण, अशाप्रकारच्या रोगांपासून रोपांचे संरक्षण कसे करायचे समजत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे रोपांना विविध रोगांपासून दूर ठेवू शकतात. चला तर मग हे उपाय कोणते आहेत ते पाहू….

रोपांना कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

काळे कीटक आणि पांढरी बुरशी झाडांची पानं, फुले आणि कळ्यांना संक्रमित करतात. जे झाडांमधील रस शोषून घेतात, ज्यामुळे झाडं सुकू लागतात. अशावेळी अनेक जण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. परंतु, ते पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने रोपांचे संरक्षण करू शकता.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?

रोपांना मिलिबग्सपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हा’ उपाय

१) सुक्या मिरच्या – साबणाच्या पाण्याचे ६ ते ७ थेंब घ्या. त्यात २ चमचे सुकी मिरची पावडर ३ लिटर पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण रोपांवर मिलिबग्स असलेल्या ठिकाणी फवारा. पण, याआधी झाडांवर पाणी शिंपडा.

२) लसूण – खराब झालेल्या लसणापासूनही तुम्ही रोपांचे कीटक आणि पांढऱ्या बुरशीपासून संरक्षण करू शकता. कीटकांना लसणाचा वास सहन होत नाही, यामुळे तुम्ही लसणाची पेस्ट करून रोपांवर लावू शकता. याने रोपांवरील कीटक दूर पळतील.

३) कडुलिंबाचे तेल – वनस्पतीवरील कोणत्याही बुरशी किंवा कीटकांपासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाचे तेल प्रभावी उपाय मानला जातो. यासाठी एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाण्यात कडुलिंबाचे तेल चांगल्याप्रकारे मिक्स करून त्याची रोपांवर फवारणी करा; अशाने रोपांवरील कीटक आणि बुरशी कमी होईल.

याशिवाय तुम्ही रोपांना दररोज पाणी घाला. यावेळी पानं चांगल्याप्रकारे धुवा, जेणेकरून पानांना चिकटलेली बुरशी, कीटक निघून जाईल. यासह नियमितपणे खत टाका.