Natural Home Remedies For Fungal Skin Infections : उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून दुर्गंधी येण्यासह अनेक प्रकारच्या संसर्गांचा धोका वाढतो. अनेकांना घामामुळे झालेल्या ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. यात शरीरावर गोल आकाराचे चट्टे तयार होतात, ज्याला खूप खाज सुटते. खाजवल्यामुळे हळूहळू हे चट्टे इतके वाढतात की शरीरभर पसरतात आणि जखम होण्यास सुरुवात होते. यामुळे फंगल इन्फेक्शनचा त्रास वेळीच रोखला नाही तर तो खूप वाढत जातो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला घरच्या घरी या समस्येपासून सुटका मिळवण्याचे काही उपाय सांगणार आहोत. अंघोळीच्या पाण्यात काही नैसर्गिक गोष्टी मिक्स करून तुम्ही फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळवू शकता. या नैसर्गिक गोष्टी कोणत्या जाणून घेऊ..

कडुलिंब, कोरफड आणि तुळशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जातात, ज्याच्या वापरामुळे तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो.

VIDEO : कोकण रेल्वेत तोबा गर्दी, प्रवाशांची अडवणूक अन् बाचाबाची; पनवेल स्थानकात नेमके घडले काय?

१) कडुलिंबाच्या झाडाची पानं

फंगल इन्फेक्शनची समस्या टाळण्यासाठी कडुलिंब हा एक चांगला उपाय आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. यासाठी कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळूून ते पाणी थंड करा. यानंतर अंघोळीच्या पाण्यात ते मिसळा आणि अंघोळ करा, ज्यामुळे फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळेल.

२) टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे आपल्या शरीराचे जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. अंघोळीच्या पाण्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून अंघोळ करा, तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून बरे वाटेल.

वजन कमी करण्याची सुरुवात कशी करायची? काय खावं काय नाही? व्यायाम कसा करायचा? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

३) कोरफड जेल

कोरफडामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्याच्या वापरामुळे जळजळ आणि संसर्गासारखे धोके दूर होतात. फंगल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी, अंघोळीच्या पाण्यात थोड्या प्रमाणात ताजे कोरफड जेल मिसळा आणि त्या पाण्याने अंघोळ करा.

४) रॉक सॉल्ट

रॉक सॉल्टमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि ते त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. अंघोळीच्या पाण्यात एक कप रॉक सॉल्ट मिसळा आणि ते चांगले विरघळू द्या. त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा.

५) लिंबाचा रस

लिंबामध्ये अम्लीय गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया काढून टाकतात आणि संक्रमणापासून संरक्षणदेखील करतात. अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस घालून अंघोळ करावी, यामुळे तुम्हाला फ्रेशही वाटेल.