सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपण किती वेळ स्वयंपाक घरात घालवतो हे कधी लक्षातच येत नाही. एखादा पदार्थ बनवताना ज्या भांड्यात तुम्ही तो बनवत आहात, ते जर जुने झाले असेल किंवा चांगल्या प्रतीचे नसेल तर गरजेपेक्षा जास्तवेळ आपल्याला काम करावे लागते. उदाहरण द्यायचे झाले तर तवा किंवा पातेलं घ्या. जर या वस्तूंचा वापर सतत होत असेल तर हळूहळू ती वस्तू जुनी होऊन, खराब होण्यास सुरुवात होते. त्यावर पदार्थ चिकटून बसण्यास सुरुवात होते. अशी काही भांडी, पातेली, तवे जर तुमच्या घरात असतील तर त्यांना बदलण्याची गरज आहे.

एखादे भांडे जुने झाल्यानंतर ते लवकरात लवकर बदलणे गरजेचे असते. नवीन भांडी घेताना कायम चांगल्या गुणवत्तेचीच घ्यायला हवी. परंतु, नवीन वस्तू विकत घेताना आपण त्यांची किंमत बघून लहान लहान चुका करत असतो. अशा चुका टाळण्यासाठी काही अतिशय सोप्या अशा टिप्स तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्या कोणत्या ते पाहा.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

चांगल्या प्रतीची भांडी घेणे आवश्यक का असते?

बाजारात गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रकारची, पद्धतींची, आकार आणि रंगांची भांडी पाहायला मिळतात. यामध्ये प्रत्येकाची गुणवत्तादेखील वेगवेगळी असते. आता महाग आणि खूपच चांगली गुणवत्ता असणाऱ्या वस्तू घेणे प्रत्येकाला जमेलच असे नाही. तरीही, किमान थोडी चांगली गुणवत्ता असणे गरजेचे असते. पण, असे का? कारण – भांड्यांचा दर्जा चांगला असल्यास त्यामध्ये स्वयंपाक करणे सोईचे होते, वेळ वाचतो, वस्तू जास्तकाळ टिकते. या सर्वांसोबतच चांगल्या गुणवत्तेची भांडी आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर असतात. “उत्तम गुणवत्तेच्या भांड्यांचा वापर केल्यास, ती अन्नपदार्थांवर कोणताही विपरीत परिणाम करत नाही. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा असतो”, असे आहारतज्ज्ञ रिचा गंगाणी [Nutritionist Richa Gangani] म्हणतात.

हेही वाचा : या पाच सोप्या हॅक्स ठेवतील इडली पात्र चकचकीत; पाहा भांड्यांना मिनिटांत स्वच्छ करतील या टिप्स…

भांडी जुनी झाली असतील किंवा नवीन घ्यायची असल्यास या पाच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, पाहा.

१. बजेट

बाजारामध्ये अनेक प्रकारची भांडी मिळतात. परंतु, त्यापैकी आपल्याला परवडणारी आणि उपयोगी असणारी भांडी निवडणे गरजेचे असते. त्यामुळे बाजारात जायच्या आधी आपल्या खर्चाचे नियोजन करावे. त्यासोबतच विकत घेण्याच्या वस्तूची गुणवत्ता, उपयुक्तता तपासून पाहावी.

२. टिकाऊपणा

एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर जर दोन-तीन महिन्यातच ती खराब झाली तर त्या खरेदीचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे भांडी खरेदी करताना ते किती काळ टिकू शकते याचा अंदाज घेऊन मगच विकत घ्यावे. यासाठी स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी भांडी [कास्ट आयर्न] हा एक चांगला पर्याय आहे.

३. उपयुक्तता

पदार्थ तळण्यासाठी, भाजण्यासाठी, एखादी भाजी बनवण्यासाठी किंवा भाकऱ्या शेकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांची आवश्यकता असते. अशावेळेस तुम्हाला नेमके कोणते भांडे हवे आहे ते ठरवा आणि त्यानुसारच वस्तू निवडा.

४. मटेरियल

बाजारात काच, लाकूड, स्टील, सिरॅमिक, मातीची, लोखंडाची अशा वेगवेगळ्या घटकांपासून/मटेरियल्सपासून बनवलेली भांडी विक्रीसाठी उपलब्ध असतात. एवढी सर्व भांडी बघून, वस्तू काचेची घ्यावी की स्टीलची असा संभ्रम एखाद्याला पडणे सहाजिकच आहे. परंतु, गोंधळून जाऊ नका. प्रत्येक वस्तूचा नीट विचार करा. तुम्हाला कोणत्या मटेरियलचा सर्वात जास्त उपयोग आणि फायदा होऊ शकतो ते ठरवून मगच वस्तू खरेदी करा.

५. उष्णता झेलू शकणारी भांडी

एखाद्या पातेल्यात, पॅनमध्ये पदार्थ शिजवण्यासाठी ठेवला; परंतु ते पटपट शिजत नसल्यास, उष्णता किंवा तापमान समान पद्धतीने पातेल्यामध्ये पसरत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे उष्णता व्यवस्थित झेलू शकणारी किंवा पदार्थ शिजत असताना भांड्यामध्ये तापमान एकसमान राहू शकेल अशा वस्तूंची निवड करावी. यामुळे अन्नपदार्थ कमी वेळात आणि व्यवस्थित शिजतील.