मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जगभरात ४० कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीमुळे त्रासलेल्या प्रत्येकाला यातून सुटका हवी आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो, अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गूळ खावा की नाही ते जाणून घेऊया.

aishwarya and avinash narkar shares dance video
Video : शाहरुख-माधुरीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव
What Uddhav Thackeray Said?
“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
sugar intake
शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी फॉलो करा ‘या’ ४ टिप्स, जाणून घ्या सविस्तर
Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळाचा चहा ठरू शकतो का फायदेशीर? जाणून घ्या

उसापासून साखर बनवण्याच्या प्रक्रियेत क्रिस्टलायझेशन झाल्यामुळे त्यातील सर्व गुणधर्म नष्ट होतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर गुळ बनवण्याच्या प्रक्रियेत त्यात आढळणारी पोषकतत्त्वे नष्ट होत नाहीत. म्हणून, गुळात कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही. परंतु गूळ हा पौष्टीक आहे.

गूळ, पोषक तत्वांनी भरलेला आहे. यामध्ये ६५ ते ८५ टक्के सुक्रोज असते. मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, तर गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत त्याचे अतिसेवन मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींना गोड खावेसे वाटत असेल, तर या रुग्णांसाठी १ ते २ चमचे गूळ मर्यादित प्रमाणात खाणे योग्य ठरेल.

मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ खाऊ नये, असेही आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदात फुफ्फुसाचा संसर्ग, घसा खवखवणे, मायग्रेन आणि दमा यांवर उपचार करण्यासाठी गुळाचा वापर होतो. उपचाराची ही प्राचीन पद्धत मधुमेहाच्या रुग्णांना गुळाचा वापर करण्यास मनाई करते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भरपूर पोषक तत्व असूनही मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाऐवजी मधाचे सेवन करावे. साखरेऐवजी गूळ खाणे सुरक्षित आहे, असा गैरसमज बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये असतो, पण हे खरे नाही. मधुमेह नसलेल्या लोकांसाठी गूळ हा साखरेचा पर्याय असू शकतो.