राज्यभरात थंडीचा कडाका वाढायला लागला असून त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. सर्दी, त्वचा कोरडी पडणे, पायांना भेगा पडणे, केस कोरडे होणे या समस्या भेडसावू लागतात. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी मग वेगवेगळ्या मॉईश्चरायझरचा वापर केला जातो. पूर्वी त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अंगाला तेल लावण्याची पद्धत होती. मात्र आता तेलाऐवजी मॉईश्चरायझर वापरले जाते. परंतु कोरड्या त्वचेसाठी तेल हा एक उत्तम पर्याय आहे. काही तेलांची शरीराला अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे ती थेट लावण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करुन किंवा दुसऱ्या एखाद्या तेलात एकत्र करुन लावल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात त्वचेसाठी उपयुक्त अशाच काही तेलांचा उपयोग…

खोबरेल तेल – खोबरेल तेल हे त्वचा मऊ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. ऑलिव्ह ऑईलपेक्षाही जास्त चांगले मॉईश्चरायझर म्हणून ते काम करते, त्यामुळे हिवाळ्यासाठी खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. तसेच या तेलात बुरशीविरोधी तसेच जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे हे तेल त्वचेच्या कोणत्याही तक्रारीसाठी अतिशय उपयुक्त असते. तुमची त्वचा ऑईली असेल तसेच तुम्हाला मुरुमांचा त्रास असेल तर या तेलाचा निश्चितच फायदा होतो.

control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

तीळाचे तेल – तिळाच्या तेलात मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड असते. हे तेल नियमितपणे वापरल्यास त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या कमी प्रमाणात येतात. त्वचेचे पोषण होण्यासाठी आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी तिळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते.

बदामाचे तेल – बदामाच्या तेलात हलके गुणधर्म असतात, त्यामुळे हे तेल चेहऱ्याच्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. यामध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, प्रोटीन्स आणि पोटॅशियम असे आरोग्याला आवश्यक असणारे अनेक घटक असतात.

जोजोबा तेल – आपल्या त्वचेमध्ये निर्माण होणारे तेल हे जोजोबा ऑईलच्या खूप जवळ जाणारे असते. यामध्ये तांबे आणि झिंक यांसारखी खनिजे तसेच त्वचेचा पोत सुधरवणारे व्हिटॅमिन बी असते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी आवश्यक असणारे घटक या तेलात असतात. तसेच या तेलात व्हिटॅमिन ए आणि ई यांचे प्रमाण जास्त असल्याने ते त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

ऑलिव्ह ऑईल – या तेलात फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ईचे प्रमाण जास्त असल्याने हे तेल एक उत्तम मॉईश्चरायझर असते. थंडीमध्ये कोरड्या पडलेल्या त्वचेला आर्द्रता मिळण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो. त्वचेमध्ये हे तेल अतिशय चांगल्या पद्धतीने मुरते. हे तेल काहीसे जड असल्याने त्याचा चेहऱ्यासाठी वापर करु नये.

द्राक्षाच्या बियांचे तेल – हे तेल वजनाने हलके असते, यामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड असते. या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटी मायक्रोबायल आणि अँटी इन्फ्लमेटरी घटक असतात.

गुलाबाचे तेल – यामध्ये विषारी घटक अतिशय कमी प्रमाणात असतात. रुक्ष त्वचेसाठी हे तेल उपयुक्त असते. यामध्ये जीवाणूविरोधी घटक असतात. चेहऱ्यावरील मेक-अप काढायचा असेल तर हे तेल अतिशय उपयुक्त ठरते.