पावसाळ्यात आपण जशी पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे शॉपिंगचे वेड असणारे अनेक जण वेगवेगळ्या ऑफर्सची चातकासारखी वाट पाहत असतात. या खरेदीवेड्यांसाठी मोठमोठे मॉल, दुकाने इतकेच काय आता शॉपिंग वेबसाईटसही अनोख्या ऑफर्स जाहीर करतात. याचप्रमाणे सध्या फ्लिपकार्ट एकामागून एक ऑफर्स जाहीर करत आहे.

सध्या फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सेल सुरु असून यामध्ये ग्राहकांना आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये लॅपटॉप, हार्डवेअर, कॅमेरा, ऑडिओ अॅक्सेसरीज अशा अनेक उत्पादनांवर विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. हा सेल २६ जुलैपर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये मेकअप आणि व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी वापरण्यात येणारी साधने १ हजार रुपयांहून कमी किंमतीला उपलब्ध आहेत.

pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…
A balasubramanian, A balasubramanian experienced man in mutual fund , mutual fund, asset management company, amfi, Association of Mutual Funds in India, sebi, Aditya Birla sunlife asset management company, Aditya Birla group, mutual fund sahi hai, mutual fund experienced man A balasubramanian, A balasubramanian mutual fund,
म्युच्युअल फंडांचा ‘सही’ विश्वास दाता! : ए. बालासुब्रमणियन
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स

याशिवाय इंटेल कोर i3 आणि i5 प्रोसेसर असलेला लॅपटॉप २६,९९० आणि ४१,९९० रुपयांना उपलब्ध आहे. एसर, लावा, आयबॉल आणि मायक्रोमॅक्सच्या लॅपटॉपच्या किंमती १०,४९९ पासून सुरु होत असून गेमिंगचे लॅपटॉपही एक्सचेंज ऑफरवर २० हजारांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय टू इन १ लॅपटॉपही ग्राहकांना साधारणपणे २६ हजारांपासून खरेदी करता येणार आहेत. विविध कंपनीच्या कॅमेरांवर भरघोस ऑफर्स देण्यात आल्या असून काहींवर ब्रँडेड हेडफोन्स फ्री देण्यात आले आहेत. अॅक्सिस बँकेचे क्रेडीट कार्ड वापरुन जर कॅमेरा खरेदी केला कर ५ टक्के आणखी सवलत देण्यात येणार आहे.

लेनोवो, अॅपल, सॅमसंग, मायक्रोमॅक्स, आयबॉल आणि इतर टॅबलेटसवरही मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. नवा आयपॅड प्रो ग्राहकांना ५० हजार रुपयांमध्ये प्री-ऑर्डरने बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना ऑर्डर केल्यानंतर ४ ते ५ दिवसात ही वस्तू मिळणार आहे. याबरोबरच हेडफोन्स, स्पीकर आणि होम थिएटरसारख्या ऑडिओ अॅक्सेसरीजवरही चांगल्या सवलती मिळणार आहेत.