लठ्ठपणा ही एक व्यापक आणि सातत्याने वाढणारी जागतिक चिंता आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुमारे ३० टक्के लोकसंख्या लठ्ठ आहे, ज्यामुळे त्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि कर्करोगाचा धोका आहे. दरम्यान, याबाबत एक नवा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. जामा(JAMA) नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या अभ्यासानुसार, “लठ्ठ लोकांच्या सामाजिक अलगीकरण (social isolation) आणि एकटेपणाची (loneliness ) काळजी घेतल्यास, आपण त्यांच्या आरोग्यविषयक गुंतागूंत आणि सर्व कारणांमुळे होणारा मृत्यूचा धोका कमी करू शकतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक अलगीकरण आणि एकटेपणा या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत हे प्रथम लक्षात घ्या. सामाजिक अलगीकरण म्हणजे एखादी व्यक्ती आणि समाज यांच्यातील संपर्काच्या पूर्ण अभावाची स्थिती आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास सामाजिक अलगीकरण म्हणजे इतरांशी संबंध नसणे. तर “एकटेपणा म्हणजे सतत एकटे वाटणे. आपल्याकडे अर्थपूर्ण किंवा जवळचे नाते किंवा आपलेपणाची भावना नाही.” या दोन्ही भावनांचा लठ्ठपणाशी संबध कसा आहे हे या संशोधनातून स्पष्ट केले आहे.

याबाबत अभ्यासाचे प्रमुख लेखक लु क्यूई (Lu Qi) यांच्या मते, “बहुतेकदा लठ्ठपणा नियंत्रित करणे आणि वजन कमी करण्याच्या धोरणांमध्ये आहार आणि जीवनशैली सुधारण्याला प्राधान्य देताना सामाजिक आणि मानसिक घटकांकडे दुर्लक्ष केले जाते. लु क्यूई हे न्यू ऑर्लीन्समधील टुलेन युनिव्हर्सिटी ओबेसिटी रिसर्च सेंटरचे संचालक, एमडी, पीएचडी, एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापकदेखील आहेत.

प्राध्यापक लु क्यूई सांगतात की, “आमच्या संशोधनाचे निष्कर्ष असे सूचित करतात की, “एकटेपणा आणि सामाजिक अलगीकरण या दोन घटकांमध्ये सुधारणा करणे, लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.” पूर्वीच्या संशोधन अभ्यासातूनही असे दिसून आले आहे की, “लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना सडपातळ लोकांपेक्षा सामाजिक अलगीकरण आणि एकटेपणाचा अनुभव जास्त असतो.”

हेही वाचा – ऑम्लेट की इडली; मधुमेही व्यक्तींसाठी सर्वोत्तम नाश्ता कोणता? जाणून घ्या डॉक्टरांकडून…

खरचं एकटेपणा लठ्ठपणाचा हा धोका वाढवणारा घटक आहे का? (WHY LONELINESS IS A RISK FACTOR)

सामाजिक अलगीकरण हे इतरांशी संपर्काचा अभाव दर्शवते, तर एकटेपणा ही अलिप्तपणाची भावना आहे, जी नैराश्यासारख्या भावनिक अवस्थेशी संबधित आहे. “दोन्ही आजार हे एंग्जायटी डिसऑर्डर (anxiety disorders), नैराश्य, हृदयविकार, स्मृतिभ्रंश, पक्षाघात आणि कर्करोगाच्या वाढत्या मृत्यूशी संबंधित आहेत, हे पद्धतशीर रिव्ह्यू मेटा-विश्लेषणातून (systematic review meta-analysis) संशोधक फॅन वांग यांना दिसून आले आहे. २०२३ मध्ये ते सामाजिक अलगीकरण, एकाकीपणा आणि मृत्यूबाबत ९० समूह अभ्यासामध्ये सहभागी झाले होते.

“व्यक्तीच्या सामाजिक वर्तनात सुधारणा केल्याने लठ्ठपणासंबंधित मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो की नाही याबद्दल फारसे माहिती नव्हते. पण, समोर आलेल्या निष्कर्षांनी सूचित केले की, “एकटेपणा आणि सामाजिक अलगीकरण सुधारल्यास लठ्ठ व्यक्तींच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.”

या संशोधनाबाबत सविस्तर चर्चा करताना डॉ. शौनक अजिंक्य यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “आपण आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असताना, इतरांच्या सहवासात राहणे आणि प्रोत्साहनामुळे लठ्ठपणा असलेल्या लोकांना दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते.” डॉ. अजिंक्य हे मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटमचे सल्लागार आणि मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

हेही वाचा – मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?

लठ्ठपणामध्ये एकटेपणा हा घटक का महत्त्वाचा आहे? (WHY LONELINESS MATTERS IN OBESITY)

एकटेपणा किंवा सामाजिकदृष्ट्या अलिप्त असलेल्या व्यक्ती भावनिक झाल्यास काही ना काही पदार्थ खाण्यास प्रवृत्त होतात. अन्न हे दुःख, चिंता किंवा कंटाळा यांसारख्या नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी सोपा पर्याय म्हणून अशावेळी काम करते.

एकटेपणा आणि सामाजिक अलगीकरण अनेकदा मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकतात. जसे की, एंग्जायटी डिसऑर्ड रआणि नैराश्य इत्यादी. आपली कोणाला गरज नाही ही भावना किंवा आयुष्य जगण्यासाठी काही उद्देश नसणे यामुळे नकारात्मक विचारांचे चक्र तयार होत असते, ज्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ खाण्याची सवय लागू शकते. तसेच यामुळे झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. अवेळी झोपण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे भूक वाढते, वजन वाढण्यास प्रोत्साहन मिळते.

एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवण्यासाठी सामाजिक संवाद मोठी भूमिका बजावते. लोक त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या सवयी आणि जीवनशैली स्वीकारतात. एकटेपणा आणि सामाजिक अलगीकरण हे एक बैठी जीवनशैली निर्माण करते, ज्यामध्ये व्यक्तीला व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त केले जात नाही. नियमित शारीरिक हालचाल कमी होणे हा लठ्ठपणासाठी एक महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहे. सामाजिक अलगीकरणामध्ये व्यक्तींसमोर एखाद्या सकारात्मक व्यक्तीचा आदर्श नसतो किंवा समवयस्क व्यक्तीचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव नसतो. चांगले सामाजिक संबंध असलेल्या लोकांमध्ये शारीरिक व्यायाम करणे, निरोगी आहार निवडणे आणि वजन नियंत्रण करणे अशा धोरणांचे पालन करण्याची अधिक शक्यता असते.

सामाजिक अलगीकरण आणि एकटेपणाचा व्यक्तीच्या भावनिक स्थितीवर, मित्र, कुटुंब आणि समवयस्कांकडे भावनिक आणि व्यावहारिक मदतीसाठी जाणे, शारीरिक हालचाल करणे, खाण्याच्या सवयी आणि एकूण जीवनशैलीच्या निवडीवर प्रभाव पाडते. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की,” वजन नियंत्रण करणे आणि एकूणच आरोग्यासाठी, सामाजिक आणि मानसिक घटकांकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can we reduce obesity by taking care of loneliness and social isolation heres what a new study says snk
First published on: 02-02-2024 at 15:36 IST