Poha Or Idli : सकाळी नाश्त्याला काय खावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. खरे तर आरोग्यासाठी फायदेशीर, असा पोषक नाश्ता खायला प्रत्येकाला आवडतो. भारतीय नाश्त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, इत्यादी अत्यंत सामान्य पदार्थ आहेत. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सकाळी पोषक आणि दिवसभर ऊर्जा टिकविणारा नाश्ता गरजेचा असतो. अशात झटपट होणारा नाश्ता म्हणजे पोहे. विषेशत: मधुमेह असणाऱ्या लोकांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी लॅक्टोज व ग्लुटेन दूर करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि फॅट्स कमी करण्यासाठी पोहे खावे.

नाश्त्यात पोहे खावे की इडली?

पोहा हा सर्वांत चांगला नाश्ता आहे. कारण- यामध्ये ७० टक्के चांगले कर्बोदके आणि ३० टक्के फॅट्स असतात. त्याविषयी नवी दिल्लीच्या आहारतज्ज्ञ देबजानी बॅनर्जी सांगतात, “पोह्यामध्ये असलेले फायबर रक्तप्रवाहात साखर हळूहळू मिसळण्यास मदत करतात. त्यामुळे अचानक रक्तातील साखर वाढत नाही. जर तुम्हाला दिवसभर उपाशी राहायचे असेल, तर सकाळी नाश्त्यामध्ये इडली, डोसा किंवा भातापेक्षा पोहे खावेत.”

पोहे आणि तांदळापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये चांगले सूक्ष्म जीव असतात; जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि त्यामध्ये व्हिटॅमिन बीसुद्धा असते. त्याविषयी बॅनर्जी सांगतात, “तांदळाच्या तुलनेत पोह्यात लोह व कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि त्याशिवाय यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो; ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी आहे आणि कमीत कमी प्रोटिन्स असलेले कर्बोदके जास्त आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता आणि कसा शिजविता यावरून रक्तातील साखरेचे प्रमाण अवलंबून असते.”
तुम्ही जर भाताबरोबर वाटाणे, फ्लॉवर, सोयाबीन, गाजर व शेंगदाणे यांसारख्या अनेक भाज्यांचा समावेश केला, तर भात हा पौष्टिक पदार्थ बनू शकतो. पोहे हे पचायला हलके असतात. त्यामुळे आपण पोहे सकाळी किंवा सायंकाळी नाश्ता म्हणून खाऊ शकतो. बॅनर्जी सांगतात, “पोह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी आहे. भाजी घातलेल्या पोह्यामध्ये २५० कॅलरीज असतात; पण त्यात असलेले आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात. कढीपत्ता टाकल्यामुळे पोहे हृदयासाठी फायदेशीर ठरतात.” जर आपण पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले, तर पदार्थातील कॅलरीजची संख्या आणखी वाढू शकते आणि पोहे हा पदार्थ अँटिऑक्सिडंट्स व प्रथिनांचा चांगला स्रोत बनू शकतो. पण, तुमचे वजन जास्त असेल, तर तुम्ही असे पोहे खाणे टाळू शकता.

पोहे हा प्रो-बायोटिक पदार्थ आहे म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे यात चांगले सूक्ष्म जीव आहेत; जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. बॅनर्जी सांगतात, “पोह्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे लोहाची कमतरता असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.”

हेही वाचा : मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?

षौष्टिक पोहे कसे बनवावेत?

देशी आणि लाल पोह्यामध्ये झिंक, लोह व पोटॅशियम यांसारखी चांगले खनिजे आढळतात; जी संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असतात. पोहे हा एक पोषक पदार्थ आहे. तुम्ही अनेक प्रकारे पोह्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकता. त्यामध्ये भाज्या, सुका मेवा, कडधान्ये व हिरव्या वाटाण्यांचा समावेश करून तुम्ही पोह्यांना अधिक पौष्टिक बनवू शकता. त्यावर थोडा लिंबाचा रस पिळा. कारण- त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करते.
भारतात पोहे पाण्यात भिजवले जातात आणि त्यानंतर ते दह्यामध्ये टाकून एकत्र करतात. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.