कंबरेत वेदना होण्याचा त्रास अनेकांना होतो. खूप वेळ एकाच स्थिती बसल्याने, वाकडे झोपल्याने किंवा थकवा येण्याने कंबर दुखी होऊ शकते. परंतु, शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील कंबरेत वेदना होऊ शकते. ‘जीवनसत्व ब १२’चे अभाव वेदना होण्याचे कारण ठरू शकते. जीवनसत्व ब १२ रक्त पेशींना निरोगी ठेवण्याबरोबरच शरीरातील उर्जा राखते. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे लवकर थकवा येतो आणि शरीरातील अनेक भागांत विशेषकरून कंबरेत वेदना होऊ लागतात. म्हणून शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्व ब मिळणे गरजेचे आहे. कंबरेची वेदना दूर करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) जीवनसत्व ब १२ ची कमतरता भरून काढणे

आहारामध्ये बदल करून तुम्ही जीवनसत्व ब १२ ची कमतरता भरून काढू शकता. आहारात टुना मासे, दूध, दही, अंडी, चीज, केळी, स्ट्रॉबेरीचा समावेश करा. या पदार्थांमधून तुम्हाला जीवनसत्व ब १२ मिळेल.

(त्वचेवर स्ट्रेच मार्क्स आहेत? करा हे ४ उपाय, फरक दिसेल)

२) हळदीच्या दुधाचे सेवन

हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने कंबरेची वेदना कमी होण्यात मदत होऊ शकते. हळदीमधील अँटी-इन्फ्लेमेटोरी आणि अँटि-ऑक्सिडेंट गुण हाडांच्या वेदनांपासून सुटका देण्यात मदत करू शकतात. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. याने कंबरीच्या वेदनेपासून आराम मिळू शकते.

३) हर्लबल टी

आले आणि ग्रीन टी मिसळून बनवण्यात आलेली हर्बल टी कंबरदुखीपासून आराम देऊ शकते. यासाठी ग्रीन टी बनवताना त्यात आल्याचे लहान तुकडे टाका आणि शिजवा. अँटि- इन्फ्लेमेटोरी गुणांनीयुक्त हा चहा कंबरीची वेदना कमी करण्यात मदत करेल.

(World Diabetes Day 2022: ‘या’ अवयवांमध्ये सूज येणे हे रक्तातील साखर वाढण्याचे धोकादायक लक्षण)

४) गरम पाणी

कंबरीची वेदना घालवण्यसाठी गरम पाणी उपयुक्त ठरू शकते. गरम पाण्याने आंघोळ किंवा बाथटबमध्ये गरम पाणी टाकून त्यात काही वेळ बसल्याने वेदनेपासून सुटका मिळू शकतो. तुम्ही कंबरेला गरम पाण्याचा शेक देऊ शकता. मात्र, पाण्याचे तापमान खूप जास्त नसावे, अन्यथा त्वचा जळू शकते.

५) व्यायाम

बसण्याच्या आणि झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या. खांद्याना सरळ ठेवून बसा आणि आवश्यक्तेपेक्षा अधिक झुकू नका. यासह व्यायाम करा, तसेच दीर्घकाळ उभे किंवा बसून राहण्याचे टाळा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin b 12 deficiency may cause waist pain and home remedies to reduce waist pain ssb
First published on: 15-11-2022 at 12:14 IST