आपण दररोज नाश्ता, दुपारच्या व रात्रीच्या जेवणासाठी अनेक पदार्थ बनवितो. हे सर्व पदार्थ बनविताना तेलाचा (Cooking Oil) वापर हा होतोच. पण, आपण स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरतो हेसुद्धा पूर्णपणे आपल्या आरोग्यावर अवलंबून असते. आपल्यातील बरेच जण विचार न करता, स्वस्त मिळतेय म्हणून कोणत्याही कंपनीचे तेल विकत घेतात आणि तेच स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. बाजारात विविध कंपन्यांची अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. आज आपण या लेखातून पाम तेलाबद्दल जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषणतज्ज्ञ सांची तिवारी आणि पोषणतज्ज्ञ व रीलॉयस वेलनेसच्या संस्थापक डॉक्टर अस्मिता सावे यांनी पॅकबंद पदार्थांमधील सर्वांत सामान्य घटक ‘पाम तेल’ याबद्दल आरोग्यविषयक चिंता आणि या तेलाचे सेवन कमी करण्याचे काही उपाय सुचविले आहेत.

आज बहुतेक खाद्यपदार्थांत पाम तेल वापरतात. पाम तेल हा वनस्पती तेलाचा एक प्रकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपण ज्या तेलाचा स्वयंपाकघरात उपयोग करतो, ते तपासून पाहणेही अनेकदा आपण विसरतो. तथापि, दीर्घकाळपर्यंत अशा तेलाच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित केलेल्या २०१८ चा अभ्यासात असे आढळून आले की, पाम तेल हे वनस्पती तेल, खाद्यपदार्थ, अनेक वस्तू, लोकप्रिय स्नॅक्स व सौंदर्यप्रसाधने आदी गोष्टींमध्ये सर्वांत जास्त वापरले जाते.

विविध कंपन्यांकडून पाम तेलाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जाण्याचे कारणही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. पाम तेलाच्या वापरात झपाट्याने होणाऱ्या विस्ताराचे श्रेय इतर वनस्पती तेलाच्या पिकांच्या जवळपास चौप्पट उत्पादनास दिले जाते. समान उत्पादनखर्चासह अन्न उद्योगासाठी अनुकूल वैशिष्ट्ये तुलनेने जास्त आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, पाम तेलात “इतर वनस्पती तेलांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण जास्त आहे.” तर, एक ग्राहक म्हणून आपण सर्वांनीच पाम तेल सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.

हेही वाचा…National Dentist’s Day: दातांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर का दिला जातो आईस्क्रीम खाण्याचा सल्ला? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ…

पाम तेलाचा वापर आणि संबंधित आरोग्यविषयक चिंता

लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषणतज्ज्ञ सांची तिवारी यांनी याबद्दल स्पष्ट केले आहे, “पाम तेल LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. म्हणजेच याला खराब कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये LDL कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि मग त्या वाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित पुढे जात नसल्याने रक्त ब्लॉक होते. स्वाभाविकत: महत्त्वपूर्ण अवयवांचे कार्य बिघडते. त्याशिवाय ऑक्सिडाइज्ड पाम तेलामुळे हार्मोनल असंतुलनामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट व संस्थापक, न्यूट्रिशन लवनीत बत्रा यांच्या मते, “पाम तेलामुळे प्रजनन समस्या उदभवू शकतात आणि यकृत, मूत्रपिंड व फुप्फुसे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो”, असे लवनीत बत्रा यांनी सांगितले आहे.

पोषणतज्ज्ञ व रीलॉयस वेलनेसच्या संस्थापक डॉक्टर अस्मिता सावे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस नॅशनल हार्ट, लंग ॲण्ड ब्लड इन्स्टिट्यूट यांनी “ग्राहकांना आहारातून पाम तेल, पामिटिक अ‍ॅसिड व चरबीयुक्त पदार्थांचा वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…उन्हाळ्यात ‘या’ पालेभाजीचा आहारात करा समावेश; उष्माघात अन् घामोळ्यांवर रामबाण उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

ऑक्सिडायझ्ड पाम ऑइलमुळे हार्मोनल असंतुलन आणि अनेक चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट व संस्थापक लवनीत बत्रा यांच्या मते, एक पोषणतज्ज्ञ म्हणून पाम तेलाचा वापर कमी करण्यासाठी किंवा पाम तेलाचे सेवन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी काही पर्याय खालीलप्रमाणे :

आरोग्यदायी स्वयंपाक तेल निवडा- ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकॅडो ऑइल किंवा सूर्यफूल तेल यांसारख्या उच्च पातळीच्या चरबीसह असणारे तेल स्वयंपकासाठी निवडा. या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते. तसेच हे सर्व तेल हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह विविध आरोग्यदायी फायदे देतात.

खाद्यपदार्थांची लेबले वाचा- पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी नीट तपासून घ्या. पाम तेल असलेली उत्पादने ओळखण्यासाठी पदार्थांच्या पॅकेटवरील लेबले एकदा वाचून घ्या. आरोग्यदायी तेलाचा पर्याय किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा नैसर्गिक घटक वापरून जेवण तयार करा.

स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या तेलांसह प्रयोग करा आणि वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वाफाळणे, बेकिंग, ग्रिलिंग यांसारख्या आरोग्यदायी स्वयंपाकाच्या पद्धतींचा स्वयंपाक बनविण्यासाठी वापर करा.

आपल्या आहाराबद्दल एखाद्या पदार्थाची निवड करण्यापूर्वी किंवा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच आरोग्याच्या चांगल्या परिणामांसाठी तुमच्या आहाराच्या सवयी बदलण्यास सुरुवात करा. अशा रीतीने आज आपण या लेखातून पाम तेलाच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहिले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why we must be aware of the ill effects of consuming palm oil and which alternatives to choose read what expert said asp
Show comments